पान:विवेकानंद.pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


स्वप्नाला आरंभ होतो. त्यांत तो आपण स्वगत आहों व आपल्याभोंवतीं देवांची आणि देवांगनांची गर्दी झाली आहे, असा भास त्याला होतो. एखाद्या मनुष्याला आपल्या पितरांना भेटण्याची इच्छा झाली, तर थेट अर्यम्यापासून स्वतःच्या वडिलांपर्यंत त्याला सर्वांचे दर्शन होते; कारण, त्या सर्वांचा निर्माणकती तो स्वतःच आहे. एखादा मनुष्य याहूनही अधिक गाढ अशा अज्ञानांत असला आणि त्याच्या डोक्यांत नानाविध नरकांच्या गोष्टी कोणी भरून दिल्या असल्या, तर मृत्यूनंतर हेच जग त्याला नरकासारखे दिसेल; आणि त्यांतील अनेकविध शिक्षांचे प्रकारही त्याच्या नजरेस पडतील. जन्म आणि मृत्यु यांचा वास्तविक अर्थ म्हटला म्हणजे आपल्या दृष्टीची दिशा बदलणे; याहून त्यांत कांहीं अधिक अर्थ नाही. आपण कोठे जात नाहीं अथवा येतही नाहीं. तसेच आपण ज्याकडे पाहत असतो, तेही कोठे जात येत नाही. आपण स्वतः एकरूप आहों. मग आपण जाणार कोठे आणि येणार कोठून ? जाणे आणि येणे या दोन्ही क्रिया आपल्या ठिकाणी अशक्यच आहेत. आपण सर्वव्यापी आहों; मग, आपण जाणार कोठे? हे शब्दही आपल्या ठिकाणी संभवत नाहींत. आकाश सदोदित स्थिरच असते. त्यावर आलेले ढग इतस्ततः फिरत असतात आणि त्यामुळे आकाश हालते, असा भ्रम ते उत्पन्न करतात. आगगाडी झपाट्याने जात असतां बाहेर नजर फेकली, म्हणजे झाडेझुडपे झपाट्याने पळत आहेत, असे वाटते. वस्तुतः आगगाडी पळत असतां दृष्टीच्या भ्रमामुळे स्थिर झाडेझुडपे पळत आहेतसे दिसते. तुम्ही स्वतः एकरूप आहां आणि स्वप्नांत अनेक प्रकारचे ढग पळतांना तुम्ही पाहात आहां. एक स्वप्न संपलें कीं दुस-या स्वप्नाला सुरवात होते. या दोन स्वप्नांत कांहीं परस्परसंबंध नसतो. त्याचप्रमाणे या विश्वांत अमुक एक कायदा आहे-नियम आहेअसें नाहीं. लहान मुलांसाठी लिहिलेलें Alice in Wonderland हैं। पुस्तक तुम्हांपैकीं पुष्कळांनी वाचले असेल. चालू शतकांत मुलांसाठीं जी पुस्तके लिहिली आहेत, त्या सर्वांत हे पुस्तक मला फारच आवडले. ते मी वाचले तेव्हा मला खरोखर फारच मौज वाटली. लहान मुलांसाठी असले एखादं पुस्तक लिहावे असेही मला वाटले. ज्यांची परस्परसंगति लावतां येणार नाही अशाच गोष्टींचा त्यांत भरणा आहे, आणि त्या पुस्तकांतली ही विशेष खुबी मला फार आवडली. एक कल्पना लिहून पुरी झाली नाहीं, तो