पान:विवेकानंद.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ५ वें.

१७३

किती आहे, हा प्रश्नच विचारार्ह नाहीं हे खरे; तथापि आतांपर्यंत केलेल्या विवेचनाचा संगतवार विचार केला, तर आपणांस काय आढळून येते ? कोणत्याही वस्तूची उपयुक्तता ठरविण्याचा आपला कस काय आहे ? त्या वस्तूपासून होणारी सुखप्राप्ति हाच आपला कस आहे. ज्या वस्तूपासून आपणांस सुखाची प्राप्ति होते, ती वस्तु उपयोगी आहे असे आपण ह्मणतों. व्यवहारांतील सर्व वस्तूंची उपयुक्तता ठरविण्याचे माप सुखप्राप्ति हेच होय. या दृष्टीने विचार केला ह्मणजे, ज्यापासून आपणांस अत्यंत सुखाची प्राप्ति होईल, ती वस्तु अत्यंत उपयुक्त आहे, हा आपला शेवटचा सिद्धांत होईल. ज्या वस्तू आपल्या सुखांत भर टाकीत नाहीत, त्यांचा उपयोग आपणांस कांहींच नाहीं, हे उघड आहे. सर्व भौतिकशास्त्रांचा विकास याच तत्त्वाला अनुसरून झालेला आहे. ज्या शास्त्राच्या वाढीमुळे मनुष्याच्या सुखसाधनांत भर पडते त्या शास्त्राकडे त्याचा ओढा आपोआपच अधिक असतो; आणि ज्या शास्त्राचा असा उपयोग त्याला होत नाही, त्याचा तो त्याग करतो. सुखांत तीन प्रकार अथवा तीन पायच्या आहेत. देहगत सुख, बुद्धिगत सुख आणि आत्मगत सुख. पशू आणि त्यांच्याच योग्यतेचीं मनुष्ये यांचे सर्व सुख देहांत सांठविलेले असते. स्वतःचा देह सुखांत राहिला ह्मणजे झालें; याहून अधिक कशाचीही पर्वा पशू करीत नाहीत. त्यांच्या साच्या हालचाली आणि खटपटी, या एकाच उद्देशाला धरून चालतात. एखादा भुकेलेला कुत्रा अथवा लांडगा आपलें भक्ष्य खात असतां तुह्मी त्याकडे पहा; ह्मणजे त्या वेळी त्याच्या हृदयांत आनंदाच्या केवढ्या मोठ्या लहरी उसळत असतात ते तुह्मांला दिसेल. खच्या मनुष्यावस्थेला पोहोंचलेला प्राणी, अशा रीतीने आनंदाचे प्रदर्शन कधीही करणार नाहीं; कारण, त्याला केवळ देहाच्या सुखानें सुख होत नाहीं. मनुष्यांना खरा आनंद केव्हां प्राप्त होतो याचे सूक्ष्म निरीक्षण केले, तर त्याचा आनंद बुद्धिगत असतो असे आपल्या लक्ष्यांत येईल. सुंदर विचारांनी मनुष्याला जो आनंद प्राप्त होतो, त्याची बरोबरी जड आनंदाशीं तो कधीही करणार नाहीं. ज्ञान्याचा आनंद या दोहोंहूनही निराळ्या प्रकारचा असतो. त्याचा आनंद आत्मगत असतो. स्वतःच्या केवलरूपांत सदैव राहणे हाच त्याचा आनंद, स्वतःच्या आनंदाकरितां बाहेरील वस्तूंवर अवलंबून राहण्याचे त्याला मरणप्राय दुःख होते. आपल्या चालू विषयाचा विचार केवळ याच दृष्टीने केला,