पान:विवेकानंद.pdf/180

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१७०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


मार्ग आहे. मुक्तिमार्गातील अडचणी दूर करण्याची हीच त्याची शस्त्रे ! यानंतर तितिक्षेचा अभ्यास करणे प्रशस्त आहे. तितिक्षा म्हणजे सहन करण्याची शक्ति. केवढेही संकट कोसळलें अथवा कसलेही मोठे दुःख प्राप्त झालें तरी त्याची यत्किचितूही दिक्कत न बाळगतां तें मुकाट्याने सहन करणे याला तितिक्षा म्हणतात. कांहीं शारीरिक दुःख झाले तरी त्याकडे लक्ष्यच द्यावयाचे नाहीं. जंगलांत कोठे तुम्ही भटकत असला आणि एखाद्या ठिकाणी वाघ भेटला तर खुशल उभे रहा. आपण काय म्हणून पळावे ? या गोष्टीचे आपणांस आश्चर्य वाटू देऊ नका. अशा प्रकारचा अभ्यास करून त्यांत पूर्ण यश मिळविणारी माणसे आजही आहेत. हिंदुस्थानांत उन्हाळ्याच्या दिवसांत भर दोनप्रहरी गंगानदीच्या तटाकी खुशाल वर डोळे करून पडणारी आणि भर थंडीच्या दिवसांत दिवसभर पाण्यात डुंबणारी माणसे आजही आहेत. या तुच्छ देहाची आणि जिवाची पर्वाच त्या माणसांना नसते. हिमालयाच्या एखाद्या हिममय शिखरावर अवधूत स्थितीत राहणारी माणसे सध्याही आढळतात. थंडी म्हणजे काय, आणि उष्णता म्हणजे काय, या दोन्ही स्थिती त्यांच्या गांवीही नसतात. यदृच्छेने घडणार असेल ते सुखेनैव घडो. मी देह नव्हे; मग त्याची स्थिति कशीही असली तरी त्याची काळजी मीं कां करावी? हाच त्यांचा अभ्यास. तुमच्या या पाश्चात्त्य देशांतल्या लोकांना या गोष्टी खन्यासुद्धा वाटणार नाहींत. त्या ख-या वाटत अगर खोट्या वाटोत; पण त्या घडतात एवढे लक्ष्यांत ठेवण्यास काही हरकत नाही. पाश्चात्य देशांतील लोक तोफेच्या तोंडावर धावून जातील अथवा भर लढाईच्या गर्दीत बिनदिक्कत शिरतील असा त्यांचा लौकिक आहे. त्याचप्रमाणे अध्यात्मिक विद्येच्या अनुभवाकरितां काय वाटेल ते करण्याची आम्हां पौर्वात्यांची तयारी आहे. ‘देह जावो अथवा राहो' त्याची पर्वा आम्हांला नाहीं. * चिदानंदरूपः। शिवोऽहं शिवोऽहम् ।” हेच आमचे नित्य चिंतन. प्रत्येक प्रकारच्या व्यवहारांत चैनीचा समावेश कसा करता येईल, याचा निदिध्यास जसा तुम्हां । पाश्चात्यांस लागतो, त्याचप्रमाणे देहभावना जाऊन ब्रह्मभावना कशी उत्पन्न होईल, हा विचार रात्रंदिवस आमच्या डोळ्यांपुढे उभा असतो. धर्म म्हणजे वेड्याची बडबड नसून, त्यांतील प्रत्येक अक्षराचा आणि अक्षराच्या फांट्याचा अनुभव या एकाच आयुष्यक्रमांत कसा घेता येईल, हे दाखविण्याची आमची