पान:विवेकानंद.pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन - प्रकरण ४ थें.

१६९


केन्हां ना केव्हां तृप्त होणारच. मग त्याकरितां एवढा अट्टहास कां करावा ? आपल्या आयुष्यांत जितक्या कांहीं खटपटी आपण करतों, त्यांत आपला एकच हेतु असतो. तो हेतु ह्मणजे चैन करणे हाच. कित्येक लोकांना ऐहिक उपभोग अपुरे वाटतात आणि ते स्वर्गसुखाकरितां खटपट करीत असतात. आपल्या मनुष्यपणाला हें खरोखर उचित नाहीं. "आशा ममता देहीं बेडी । सुसरी करिताती ताडातोडी । वोहून दुःखाचे सांकडी । माजी घालिती ॥ " हैं साधुवचन आपण नित्य लक्ष्यांत बाळगण्याचा अभ्यास केला पाहिजे. जीवित हैं मृगजलासारखे आहे. वस्तुतः मृत्यूलाच जीवित हैं एक दुसरें नांव आहे. 'मी जीवंत आहे, मी संसार करतों' या भावनांचा त्याग कर ण्यास आपण शिकले पाहिजे. या जीविताची काळजी कोणी वहावी ? आमच्याठायीं जे अनेक भ्रम आहेत त्यांतलाच हाही एक भ्रम आहे. मग या भ्रमाची पर्वा आपण कशाला करावी ? एका प्रकारच्या भ्रमाला आपण सुख समजतों आणि त्याच्याच दुसन्या भावंडाला दुःख ह्मणतों. आपल्या साच्या आयुष्यांतील नानाविध स्थितींचें वास्तविक स्वरूप या प्रकारचें आहे. जीवित आणि मृत्यु या दोन्ही स्थितींचा विचारच आपणांस नको. ही सारी आपल्याच मनाची प्रजा आहे. आपल्या मनानेंच हीं निर्माण केली आहेत. जन्ममृत्यूंचा विचार सर्वथा टाकून देणें यालाच त्याग असें ह्मणतात. त्यागी मनुष्य ऐहिक अथवा पारलौकिक सुखाचा विचार कधींही करीत नाहीं. या गोष्टी त्याच्या मनांत येतच नाहींत.
 ही स्थिति आपणांस प्राप्त झाल्यानंतर मनावर ताबा चालविण्याचा अभ्यास करावा. त्याजवर कसल्याही प्रकारची लाट उठू नये इतकी शांति त्याला प्राप्त झाली पाहिजे. त्याजवर लाटा उठत आहेत तोपर्यंत अनेक प्रकारच्या इंद्रियसुखांचें चिंतन केल्यावांचून ते राहणार नाहीं. याकरितां मन अत्यंत स्थिर करण्यास शिकले पाहिजे. आपल्या इच्छाशक्तीनें मनाची शांतता अशी पक्की करावी कीं, आंत-ल्या अथवा बाहेरच्या कारणांनीं त्यानें स्वस्थिति सोडूं नये. राजयोगांतील अथवा हठयोगांतील विशेष प्रकारच्या मानसिक अगर शारीरिक शिक्षणाची मदत ज्ञानयोगी घेत नाहीं. त्याचा मुख्य मार्ग म्हटला म्हणजे चिंतन हाच होय.आध्यात्मिक विद्येतील प्रमेयांचें सदैव चिंतन करून ज्ञानावरील पडदा दूर करणें, स्वतःची इच्छाशक्ति दिवसेंदिवस अधिक प्रखर करीत जाणें हा त्याचा