पान:विवेकानंद.pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


अपवित्र झाले. त्या दिवशीं त्यानें मेजवानीचा बेत केला होता. त्यामुळे त्या बिचाऱ्या मुसलमानाला फार खेद झाला. तो एका मुल्लाकडे जाऊन ह्मणाला, "कोल्ह्यानें माझें अन्न अपवित्र करून टाकले आहे. आतां कसें करावें? मंडळी तर भुकेनें आतुर आहे आणि आतां घरांत दुसरें अन्न नाहीं. जें कांही आहे तें त्या रांडलेकानें विटाळून टाकले आहे. मुल्लानें एक क्षणभर विचार करून झटलें, 'एखादा कुत्रा घेऊन ये आणि त्याजकडून त्या अन्नांतला थोडासा भाग खावव. कोल्हा आणि कुत्रा यांचें जन्मजात हाडवैर असतें. याकरितां कोल्ह्याच्या स्पर्शाच्या अन्नावरोवरच कुत्र्याच्या स्पशीचें अन्न तुझ्या पोटांत गेलें, ह्मणजे दोन्ही एकमेकांचीं पायें भस्म करून टाकतील.' आपली स्थिति बऱ्याच अंशीं अशा प्रकारची झाली आहे. आपणही त्या मुसलमानासारखेच पेंचांत सांपडलों आहों. 'मी अपूर्ण आहे' या भ्रमानें आपणांस पछाडलें आहे. हा भ्रम नाहींसा करण्याकरितां 'अभ्यासानें मुक्ति मिळवावयाची आहे ' हा भ्रम तेथें उत्पन्न केला पाहिजे. कांट्यानें कांटा काढण्याचा हा प्रकार आहे. ' तूं मुक्तच आहेस ' एवढे नुसते शब्दही कोणास पुरे होतात. ते ऐकल्या- बरोबर कांहीं धीर पुरुष जगम एकदम फेंकून देऊन मोकळे होतात; पण तुमच्याआमच्यासारख्यांना ही कल्पना मगरमिठी मारून बसली आहे. तिचा दाब ढिला पाडण्याकरितां आपणांस प्रचंड खटाटोप केला पाहिजे.
 ज्ञानयोगी होण्याला योग्य कोण, याचाही विचार येथें करणें अवश्य आहे. ज्ञानयोगी होण्याला कांहीं साधनांची आगाऊ तरतूद केली असली पाहिजे. कर्मफलत्याग हें पहिले साधन आहे. आपण कोणतेही कर्म केलें, तरी त्याचें ऐहिक अथवा पारलौकिक फळ मिळावें अशी नुसती कल्पनासुद्धां चित्ताला शिवतां उपयोगी नाहीं. ही कल्पना शिरली कीं चित्त विटाळले. आपण असा विचार करावा, की, जर आपण या साऱ्या विश्वाचे निर्माणकर्ते आहों, तर आह्मांला जें कांहीं हवें असें वाटेल तें आपणांस खास मिळेल. कारण तें उत्पन्न करण्याचें सामर्थ्य आपल्या ठिकाणी आहे. कोणाच्या इच्छा आजच तृप्त होतात, आणि दुसऱ्या कोणाच्या कांहीं काळानें तृप्त होतील. कारण, कित्येकांचे कांहीं विशिष्ट संस्कार उदय पावले असले, तर ते इच्छातृप्तीच्या आड येत असल्यामुळे ती तृप्ति प्राप्त होण्याला अधिक वेळ लागेल इतकेंच याकरितां, इच्छेची तृप्ति करण्यांत आयुष्याचा व्यय करणें उचित नाहीं. ती