पान:विवेकानंद.pdf/177

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन - प्रकरण ४ थें.

१६७


 येथवरची विचारमालिका अगदीं सुसंगत आहे यांत शंका नाहीं; पण आतां यापुढे असा एक प्रश्न उद्भवतो कीं, या साऱ्याचा अनुभव आपणांस कसा येईल ? त्यासाठीं कांहीं अभ्यास केला पाहिजे काय ? आपल्या दृष्टीनें खरा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे. या एकत्वाचा अनुभव आपणांस हवा असेल तर त्याकरितां अभ्यास केला पाहिजे, हें निराळें सांगावयालाच नको. तुमचें रूपां- तर होऊन त्यांतून ब्रह्म नवीन निर्माण होतें असें नाहीं. तुझी वस्तुतः ब्रह्म- रूपच आहां; तुझी परमेश्वररूप- ब्रह्मरूप होणार असें नाहीं, तुझी स्वयमेव ‘मी अमुक पूर्णरूपच आहां. आपण तसे नाहीं असें वाटणें हाच भ्रम. व्यक्तिविशेष ' असें जें आपणांस सदोदित वाटत असतें तें भ्रमामुळेच होय. या भ्रमाचा निरास, एका प्रकारच्या भ्रमानें करावयाचा असतो. अभ्यासश्रमानें या पूर्वभ्रमाचा निरास होतो. आगीनें आग मारण्याचा हा प्रकार आहे. जुना भ्रम नाहींसा करण्यासाठी तेथें नवा भ्रम आपणांस उत्पन्न करावा लागतो. हा नवा भ्रम उत्पन्न झाला, ह्मणजे तो जुन्या भ्रमाचें उच्चाटण करतो आणि नंतर स्वतःही नाहींसा होतो. आतां अभ्यासक्रमाचें मूलतत्त्व काय आहे याचा विचार करूं. एक गोष्ट आपण नित्य लक्ष्यांत बाळगली पाहिजे ती ही कीं, मुक्ति ही कांहीं कोठून बाहेरून आणण्याची जिन्नस नाहीं.आपण वस्तुतः सदैव मुक्तच आहों. या वस्तुस्थितीविरुद्ध येणारी जी जी कल्पना ती भ्रमाचें कार्य आहे. 'मी दुःखी आहे, अथवा मी सुखी आहें, असें वाटणें हा सुद्धां भ्रमच. या ठिकाणी दुसऱ्या एका प्रकारचा भ्रम निर्माण केला पाहिजे. ' मला मुक्ति मिळवावयाची आहे, आणि त्याकरितां मला अभ्यास केला पाहिजे. त्याकरितां मला ईश्वरोपासना केली पाहिजे.” हा दुसरा भ्रम पक्का उत्पन्न झाला, ह्मणजे तो पहिल्या भ्रमाला आपल्या चित्तांतून हांकून लावील आणि शेवटीं स्वतःही नाहींसा होईल.
 मुसलमान लोक कोल्ह्याला अपवित्र प्राणी समजतात. तसेंच हिंदु लोक कुत्र्याला अपवित्र समजतात. खाण्याच्या एखाद्या पदार्थाला कोल्हें शिवलें, तर तो पदार्थ मुसलमान लोक फेंकून देतात. तो ते तोंडांत घालणार नाहींत. एकदां एका गरीब मुसलमानाच्या घरांत एक कोल्हें शिरले. त्यावेळी जेव- णाची अगदी तयारी झाली असल्यामुळे सर्व पदार्थ वाढून ठेवले होते. त्यां- पैकी एक खाण्याचा जिन्नस त्या कोल्ह्यानें पळविला. त्यामुळे ते सर्व अन्न