पान:विवेकानंद.pdf/175

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन-प्रकरण ४ थें.

१६५


सिद्ध होतें. पारतंत्र्याच्या पाशांत जखडून बांधलेल्या आम्हां मनुष्यांच्या ठि काणीं, ‘मी स्वतंत्र आहें' ही जाणीव कोठून उद्भवते? आकाश वस्तुतः नीलवर्णाचे असून, ढगांनी व्यापलें गेलें म्हणजे तें त्या ढगांच्या रंगाचें दिसूं लागतें; आणि त्याचा निळा रंग मधूनमधून फाटलेल्या ढगांच्या फटींतून मात्र दिसत असतो. त्याचप्रमाणे आमच्या स्वतंत्र - सदैव मुक्त-आत्म्यावर मायेचें आवरण पूर्ण असतांही, त्याच्या स्वातंत्र्याची प्रभा मधूनमधून अंशतः मात्र दिसत असते. आपलें खरें स्वातंत्र्य या आवरणाच्या मागे आहे. आपल्या स्वातंत्र्याच्या •साया बढाया है मधूनमधून दिसणारें अंशस्वरूप आहे. या मायेच्या राज्यांत, या भ्रमांत, अनेकतेनें भासणाऱ्या या विश्वाच्या कल्पनेंत आणि इंद्रियें, देह व मन यांनी निर्माण केलेल्या हद्दीत, स्वातंत्र्याचा पूर्ण प्रत्यय येणें शक्यच नाहीं. आमच्या डोक्यांत भरून राहिलेल्या या विश्वकल्पनेचें शास्त्रीय • दृष्ट्या पृथक्करण केलें, तर काय दिसून येतें ? सर्वच स्वप्न; त्याला आदि नाहीं आणि अंतही नाहीं. लगाम नसलेल्या घोड्याप्रमाणें उधळलेल्या आणि अना वर अशा आपल्या मनाच्या या साया उड्या; ज्यांला कांहीं धरबंध उरलेला नाहीं, आणि ज्यांत कोठेंही एकतानता नाहीं, अशी ही आपली विश्वकल्पना आहे. एक वीस हातांचा राक्षस आपणांस धरण्यास येत आहे आणि आपण पळत सुटलों आहों असे स्वप्न आपणांस पडलें, तरी त्याक्षणी 'हैं खोटें आहे' असे आपल्या मनांत येत नाहीं. यांत कांहीं गैरशिस्त झालें असें आपणांस वाटत नाहीं. मायेच्या राज्यांतील कायद्यांचा कडकपणा अशाच प्रकारचा आहे. स्वप्न शिल्लक आहे तोपर्यंत त्यांत घडणाऱ्या साच्या गोष्टी बरोबर आहेत, असेंच वाटत असतें. विश्वांत सर्व गोष्टी नियमबद्ध आहेत असे आपण म्हणतों. त्यांना विश्वव्यापी कायदे असे आपण गंभीर नांव देतों; पण त्यांचा कायदे- पणा हें स्वप्न सुरू असेपर्यंतच आहे. त्या कायद्यांना आणि नियमांना वास्त- विक अस्तित्व नाहीं. विश्वकल्पना हाच भ्रम; मग त्यांतील कायद्यांना तरी सत्यत्व कोठून येणार ? अनेकतेनें भासमान होणाऱ्या विश्वांत ज्या अनेक घटना घडत आहेत, ती केवळ यध्च्छा आहे. कावळा बसायला आणि खांदी ·मोडायला गांठ पडली, म्हणून 'कावळा बसला म्हणजे खांदी मोडते' असा नियम नव्हे; त्याचप्रमाणे विश्वांतील अनेक घटना याच प्रकारच्या काकतालीय न्यायानें घडतात. जगम शिल्लक आहे तोपर्यंत तो कायदाच असे आपणांस