पान:विवेकानंद.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन - प्रकरण ४ थें.

१६३


भ्रमानें' हेच. अशा रीतीनें आपण चाललों, तर भ्रमाला प्रथम कोणीं उत्पन्न केलें हें सांगता येणे शक्य नाहीं. भ्रम हासुद्धां अनादिच झटला पाहिजे. आतां यापुढे फक्त एकच प्रश्न विचारण्याचा अधिकार तुझांस उरतो. "भ्रम अनादि आहे असे तुझीं ह्मणतां, आणि आत्मा अनादि आहे हे तुह्मीं अगोदरच सिद्ध केले आहे; अर्थात् दोन अनादि वस्तूंचे अस्तित्व तुह्मीं कबूल केल्यासारखे झालें. मग “एकमेवाद्वितीयम् ” या तुमच्या अद्वैतमताची वाट काय ?" यावर आमचें उत्तर असें आहे कीं, भ्रम हा अस्तित्वरूप आहे असें ह्मणतां येत नाहीं. आपल्या आयुष्यक्रमांत हजारों स्वप्ने आपणांस पडतात; पण त्यामुळे तुमच्या जीवनक्रमाचा ओघ यत्किंचित् तेरी बदलतो काय ? स्वप्ने येतात आणि जातात; त्यांना वास्तविक रीतीनें अस्तित्व आहे असें ह्मणतां येत नाहीं. भ्रमाला खरोखर अस्तित्व आहे असें ह्मणणें ह्मणजे, नुसता शब्दच्छल अथवा वक्रवाद करणे होईल. याकरितां सच्चिदानंद हेच एक अस्तित्व विश्वांत आहे असें ह्मटले पाहिजे. हेच तुमचें खरें स्वरूप आहे. अद्वैतमताचा शेवटचा सिद्धांत हाच आहे.
आतां केवळ व्यावहारिक दृष्टया येथें एक प्रश्न संभवतो. जर सर्वच एक आहे असें ह्मटले, तर नाना धर्म, नाना पंथ, नाना मतें, नाना प्रकारचे पूजा- विधी आणि उपासनापद्धती जगांत चालू आहेत त्यांची वाट काय ? शास्त्रीय दृष्ट्या अद्वैत मत बरोबर असले, तरी ते सर्वांना एकदम पटेल असें नाहीं. याकरितां नानापंथ आणि पूजाविधी यांचें अस्तित्व जगांत राहणारच. हे नानापंथ आणि नानाविधी परमेश्वराच्या भेटीकरितां अंधारांत चांचपडत आहेत. कोठूनतरी उजेड येऊन आपला रस्ता आपणांस दिसूं लागेल असे त्यांस वाटत आहे. आत्मा स्वतःला पाहू शकत नाहीं हें आपण अगोदर सिद्ध केलेंच आहे. आपले सर्व ज्ञान एकत्र केलें तरी तें मायेच्या (भ्रमाच्या ) विस्ताराबाहेर जाऊं शकत नाहीं. आणि स्वातंत्र्य - मुक्ति - ही मायेच्या पली- कडची स्थिति आहे. मायेच्या हद्दींत आपण आहों तोंवर तिच्या कायद्यांची अंमलबजावणी ती आपल्यावर करणारच. तोंवर आपण तिचे बंदेगुलाम आच. तिच्या राज्याची हद्द ओलांडून आपण पलीकडे गेलों ह्मणजे तिचे कायदे पाळण्याची गरज आपणांस नाहीं. सच्चिदानंदरूप विश्वरूपानें दिसत आहे तोपर्यंत मायेच्या कायद्याची सत्ता त्याजवर आहेच; पण त्यापलीकडे