पान:विवेकानंद.pdf/170

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१६०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

 मनोबुद्धयहंकारचित्तानि नाहं न च श्रोत्रजिवे न च घ्राणनेत्रे ।
 न च व्योम भूमिर्न तेजो न वायुश्चिदानंदरूपः शिवोहं शिवोहम् ॥१॥ .
 जर माझे हजार देह दुःखांत आणि रोगांत खितपत पडले असतील, तर दुसरे हजार, आरोग्यसुख भोगीत असतील. जर हजार देह भुकेने व्याकूळ झाले असतील, तर दुसरे हजार, पंचपक्वान्ने खात बसले असतील, जर हजार देहांत मी दुःख भोगीत असेन, तर दुस-या हजारांत मी आनंदाच्या उच्च पर्वतावर बसलो असेन. आतां मीं निंदा कोणाची करावी अथवा स्तुति तरी कोणाची करावी ? मी कोणाच्या पाठीमागे लागावे अथवा कोणाला चुकविण्याचा यत्न करावा ? मी माझीच स्तुति करतो आणि मी माझीच निंदाही करतो; कारण, हे सारे विश्व मीच आहे. मी माझ्या इच्छेप्रमाणे दुःख अथवा सुख भोगतों; कारण, मी स्वतंत्र असल्यामुळे माझ्या इच्छेप्रमाणे वागण्याला मी मोकळा आहे.” हें ज्ञानमार्गाचे अंतिम पर्यवसान आहे. खरा ज्ञानी म्हटला, म्हणजे सदोदित शूर आणि निधड्या छातीचा असतो. जगांतील कोणत्याही परिस्थितीने त्याचे चित्त कंप पावत नाहीं. * आतां वसुधातळही बुडो । वरि हे गगनमंडळही पडो ॥” ज्ञान्याच्या मुखावरील मधुर हास्याचा भंग होत नाही. जगाला मुळांतच अस्तित्व नव्हते, आणि आपण पाहतो तें सारें स्वप्न आहे, ही त्याची जाणीव कधीही नष्ट होत नाही. सर्व विश्व वितळत जाऊन अखेर गुप्त होते हैं तो-ज्ञानी-पाहत असतो. मग विश्व पूर्वी असून नाहीस झालें कीं ते मुळांतच नव्हते, इतकाच प्रश्न तो स्वतःला विचारीत असतो.
 या ज्ञानमार्गाच्या व्यवहार्य रूपासंबंधी विचार करण्यापूर्वी आणखी एका बौद्धिक प्रश्नाचा विचार करू. आरंभापासून आतापर्यंत केलेले विवेचन आपल्या ॐ तारम्यबुद्धीला किती धरून आहे, हे आपल्या लक्ष्यांत आलेंच असेल. आतां पर्यंत गुंफलेली विचारमालिका तर्कशास्त्राशीं इतकी पक्की जखडली गेली आहे, की, तींत कोठेही बोट ,शिरकावयास जागा नाही. आपल्या विवेचकबुद्धीला धरूनच या प्रश्नांचा विचार करावयाचा असा ज्याचा खरोखर निर्धार असेल, त्याला अद्वैतसिद्धांतापर्यंत मजल मारल्यावांचून गत्यंतरच नाही. एकात्मता हे सत्य आणि अनेकात्मता हे स्वप्न हाच शेवटचा सिद्धांत आहे असे त्याला कबूल करावे लागेल. बुद्धिगम्य मार्गाने जाणाच्या मनुष्याला हा सिद्धांत कबूल करणे भागच आहे. आता येथे एक असा प्रश्न उद्भवतो, की जे अनंत, स्वयंपूर्ण