पान:विवेकानंद.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ४ थे.

१५५


त्याला झाली, म्हणजे प्रथम एखाद्या सूक्ष्म बीजकोशांत तो ते पाहूं लागतो. या बीजकोशापासून त्याची दृष्टि अधिक अधिक विस्तृत होऊ लागली, म्हणजे अधिक विस्तृत आकाराचे आरसे-झाडेझुडपे, पशुपक्षी इत्यादि-तयार होऊ लागतात. हे आरसे क्रमाने अधिकाधिक श्रेष्ठ होत जातात; व सर्वांत श्रेष्ठ आरसा म्हणजे पूर्णत्व पावलेला मनुष्य. एखाद्या मनुष्याला स्वतःचे तोंड पाहावेसे वाटले, आणि त्याने एखाद्या गढूळ डबक्यांत पाहिले, तर त्याच्या चेहयाची सामान्य रूपरेषा मात्र त्याला दिसेल; पण त्याहून अधिक स्वच्छ पाण्यांत पाहिल्यास, स्वतःचे तेच रूप त्याला अधिक स्पष्ट दिसेल; त्यानंतर एखाद्या धातूच्या चकचकीत पत्र्याकडे त्याने पाहिले, तर तेच स्वच्छ पाण्यांतील रूपाहूनही अधिक स्पष्ट होईल; आणि त्याने स्वच्छ बिलोरी आरशांत पाहिले, तर स्वतःचे अत्यंत स्पष्टरूप-जसे आहे तसे त्याला दिसेल. पूर्णत्व पावलेला मनुष्य हा या आरशासारखा आहे. त्यांत त्या अनंत:सर्वज्ञाचे यथास्थित प्रतिबिंब उतरलेले असते. मनुष्यप्राणी सृष्टपदार्थांची पूजा स्वभावतःच को करतो, आणि त्याला त्यांची स्वभावतःच आवड कां आहे, हे तुम्हांस आतां कळले असेल. पूर्णत्व पावलेल्या मनुष्याचे पदरज, लक्षावधि लोक डोक्यावर घेतात याचे रहस्यही हेच आहे. त्यांचा अधिक्षेप कोणी कितीही केला, तरी जनतेच्या दृष्टीने ते पूज्यच ठरणार ! भगवान् बुद्ध आणि भगवान् ख्रिस्त यांची नांवे, याच कारणानें पूज्य गणिली जातात. अनंत सर्वज्ञाच्या त्या शुद्धप्रतिमा होत. ईश्वर कसा असेल याबद्दल कितीही उच्च कल्पना आपण केल्या, तरी त्या यांच्या प्रत्यक्ष उच्चत्वाच्या पासंगालाही लागणार नाहींत. ईश्वराबद्दल केवढीही विशाल कल्पना आपल्या डोक्यांत उद्भवली, तरी ती या प्रत्यक्षापुढे केवळ बिंदुवत होईल. त्यांच्या ठिकाणीं ध्याता, ध्येय आणि ध्यान, ही त्रिपुटी एकरूप झालेली असते.त्यांचा भ्रमनिरास पूर्ण झालेला असतो. आपण सर्वकाळ एकरूपच आहों ही खूण त्यांना पूर्णत्वाने पटलेली असते. जर आम्ही सर्व परमात्मरूप आहों स्वतंत्र आहों-असे म्हणतां, तर सृष्टीच्या कायद्याच्या खोड्यांत आमचे पाय अडकले हे कसे ? या बंधनाची उत्पत्ति कोठून झाली ? पूर्णत्व हाच ज्याचा स्वभाव, तो प्राणी अवनत होऊन अपूर्णत्वाला कसा गेला ? या प्रश्नांना अद्वैता” असे उत्तर दिले आहे की, तुम्ही परतंत्र कधीच नव्हतां, सध्या नाहीं आणि पुढेही कधी होणार नाही. तुम्ही सदैव स्वतंत्रच आहां. आकाशांत