पान:विवेकानंद.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१५०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


उरलें तें सारें अज्ञान. ते सर्व अज्ञानाचा परिणाम आहे. याकरितां ‘मला ज्ञान मिळविले पाहिजे' ही भाषाच चुकीची आहे ! कारणं मी स्वतःच ज्ञानरूप आहे ! मी स्वतःच चिद्रूप आहे ! जीवित हे माझ्या चिद्रूपाचे एक व्यक्तरूप आहे इतकेंच. माझ्यावांचून या जगत्रयांत कशालाही अस्तित्व नाहीं. हे सारे अस्तित्व मीच आहे. मीच भुतांची रूपें धारण करतो; तथापि वस्तुतः मी मुक्त आणि एकरूपच आहे ! मुक्तीची इच्छा तरी मला कशाला हवी ? मुक्तीची इच्छा मी मुळीच करीत नाही. कारण मी बद्ध असा कधीच नव्हतो. तुम्ही स्वतः ‘बद्ध' असे म्हटले, की मग तुम्हाला सोडविणारा कोणीही नाही. मग तुम्हांला बद्धच राहिले पाहिजे. आपल्या पायांत अडकविण्याकरितां तुम्हींच ‘बद्ध' ही श्रृंखला घडवितां. ६ असोनियां मुक्त बळे झाला बद्ध । घेउनियां छंद माझे माझे ॥' अशी वस्तुस्थिति आहे. तुम्ही मुक्त आहां ही खूण तुम्हांला एकवार पटली, की त्याक्षणीच तुम्ही मुक्त आहां, हेच ज्ञान. सर्व प्रकृतीचा शेवट होण्याचे ठिकाण हॅच.