पान:विवेकानंद.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन-प्रकरण ३ रें.

१४९


तुम्ही स्वतःच वास्तविक विश्वरूप आहां असे म्हणावयाला काय हरकत आहे ? हे सव विश्व तुम्हीच व्यापिलें आहे. तुम्ही नाहीं असे ठिकाण साच्या विश्वांत एकही नाहीं. * सर्वतः पाणिपादं तत्सर्वतोऽक्षिाशरोमुखम् । सर्वतः श्रुतिमल्लोके सर्वमावृत्त्य तिष्ठति ॥” ( गीता १३. १३ ) सर्व हस्तांनी तुम्हीच काम करीत आहां, सर्व मुखांनीं तुम्हीच भक्षण करीत आहां; आणि सर्व मनांतून विचारही तुम्हीच करीत आहां. तुम्हीच सर्व विश्व आहां. हे दृश्य विश्व तुमचेच शरीर आहे. अव्यक्त अथवा व्यक्तविश्व ही दोन्ही तुमचींच रूपे आहेत. ज्याप्रमाणे विश्वाचा आत्मा म्हणजे तुम्हीच आहां, त्याचप्रमाणे शरीरही तुह्मीच आहा. तुम्हीच परमेश्वर, तुम्हीच देवदूत, तुम्हीच मनुष्य, तुम्हीच पशुपक्षी, तुम्हीच झाडेझुडपे आणि खनिज पदार्थही तुम्हीच आहां. जें जें कांहीं दिसतें तें तें सर्व तुम्हीच. ज्याला अस्तित्व म्हणून आहे ते सर्व तुम्हीच. आतां येथे एक गोष्ट मात्र विशेषेकरून लक्ष्यांत बाळगली पाहिजे, ती ही की तुम्ही' या शब्दाचा अर्थ या लहानशा देहांत स्वतःस कोंडून बसलेला अहंकारी 'मी' असा नाहीं; तर तुमचे जे मूलरूप-शुद्धरूपते, असे समजावे.
 आतां येथे एक प्रश्न असा उद्भवतो, की सर्वव्यापी स्वरूपाचे असे जे तुम्ही ते अनेक रूपांनी कसे दिसू लागला ? तुमचे इतके अगणित तुकडे कसे झाले? मनुष्ये, पशुपक्षी, झाडेझुडपे इत्यादि अनेक रूपे तुम्ही कशी घेतली ? या प्रश्नाला अद्वैतमताचे उत्तर असे आहे की हे सर्व भाग केवळ दृश्यमात्र आहेत. वस्तुतः तुमचे भाग झालेले नसून अनेक भाग झाल्याचा भास मात्र होतो. अमर्यादाचे भाग करता येणे शक्य नाहीं हे आपण प्रथम सिद्ध केलेंच आहे; याकरितां, आपण केवळ अंश आहों ही कल्पनाच संभवत नाहीं. ही कल्पना निर्भेळ खोटी आहे. मी म्हणजे 'अमुक राजश्री' ह्या कल्पनेला कोणत्याच कालीं सत्यत्व नव्हते आणि पुढेही कधी येणार नाही. ही कल्पना निवळ स्वप्नरूप आहे. “एतर्बुद्ध्वा बुद्धिमान् स्यात् कृतकृत्यश्च भारत।” ( गीता १५. २० ). ही खूण पटवून घ्या आणि मुक्त व्हा. अद्वैतमताचा हाच सिद्धांत आहे. ‘मनौबुद्धयहंकाराचत्तानि नाहम् । न च श्रोत्रजिव्हे न च घ्राणनेत्रे ॥ न च व्योमभूमिर्न तेजो न वायुः । चिदानंदरूपः शिवोऽहं शिवोऽहम् ॥” ( निर्वाणषटकम् १. ) हेच ज्ञान. या खेरीज बाकी जें कांहीं