पान:विवेकानंद.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


वस्तूचा विचार करावयाचा म्हटले, की अमर्यादाचा विचारही आपोआप उत्पन्न होतो. या दोन विचारांची जोडी फोडणे आपणांस शक्य नाही. याच विचारसरणीने आपण पुढे चाललो, तर पुरुष-आत्मा हा अमर्याद–सर्वव्यापी-असला पाहिजे असे आपणांस आढळून येईल. आतां येथे एक असा प्रश्न उद्भवतो कीं अमर्याद-सर्वव्यापी अशा स्वरूपाच्या दोन वस्तू एकाच वेळी असू शकतील काय ? अशा प्रकारच्या दोन वस्तू असू शकतील असेही घटकाभर गृहीत धरून चालू. या दोन वस्तूंना आपण 'अ' आणि 'ब' अशी नांवे देऊ. या दोन वस्तू एकत्र आल्याबरोबर प्रथम एकमेकांनाच मर्यादा घालतील. कारण, *अ' वस्तु, ती 'ब' नव्हे आणि 'ब' वस्तु ती 'अ' नव्हे, हे उघड आहे. या दोहोंचीं स्वरूपें कसल्या तरी बाबतींत भिन्न असली पाहिजेत; म्हणजे त्या वस्तू, स्वरूपाच्या बाबतीत आपोआपच मर्यादित झाल्या. यावरून दोन अमर्याद वस्तू एकत्र असणे शक्य नाही. याकरितां अमर्याद-सर्वव्यापी-वस्तु एकच असू शकेल. तसेच सर्वव्यापी वस्तूचे भाग करतां येणेही शक्य नाही. सर्वव्यापी वस्तूचे भाग केले, तरीही ती वस्तु सर्वव्यापीच राहील; कारण, तिचे भाग पाडले तरी ते एकमेकांपासून भिन्न करता येणे शक्यच नाहीं. पाण्याचा एक अमर्याद समुद्र आहे अशी आपण कल्पना करूं. त्यांतून एखादाही थेंब निराळा करतां येणें आपणांस शक्य नाही. कारण, तो निराळा केला अशी कल्पना केली, तर त्या समुद्राच्या मूलरूपांत तेवढ्या थेंबाने उणेपणा आला असे होईल. ज्यांत उणेपणा येतो ती वस्तु अमर्याद होऊ शकणारच नाही. याकरितां एक अमर्याद वस्तु आणि तिचे भाग या दोन कल्पना एकत्र राहूंच शकत नाहींत. अमर्याद वस्तु म्हटली, की ती एकच असली पाहिजे आणि तीही अविभाज्यच असली पाहिजे हे सिद्ध झाले. अमर्याद वस्तु दोन असल्या, तर त्या एकमेकींसच मर्यादित करतील. तसेच अमर्याद वस्तूचे भाग पडले, तर त्या भागांमुळेच तिला मर्यादा पडेल. अस्तु.
 आतां ही प्रमाणेही बाजूला ठेवली तरी याहूनही बलवत्तर प्रमाणे आमच्यापाशी आहेत. पुरुष एकच आहे, इतकेच नव्हे तर सर्व विश्वही एकरूप आहे असे आमचें -ह्मणणे आहे. आपण आपली पूर्वीची बीजगणितांतील चिन्हें पुन्हा एकवार घेऊ. 'क्ष' + चित्ताचा अंश' यांच्या संयोगाने बाह्यजग निर्माण होते आणि 'ब' + चित्ताचा अंश' यांच्या संयोगाने