पान:विवेकानंद.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.


नावर चार भिंती उभ्या केल्या, ह्मणजे तेवढ्या जाग्याला मर्यादित खोलीचे स्वरूप प्राप्त होते तसेच हे आहे. ‘चित्' हें ज्ञानाचे मूलरूप आहे. आपण ज्याला सामान्य भाषेत ज्ञान या नावाने ओळखतों तेच चित् असे मात्र . समजू नये. कारण, आपलें * ज्ञान' हे मूलरूप नसून मिश्ररूप आहे. त्याचप्रमाणे इच्छा, विवेचकबुद्धि अथवा उपजतबुद्धि ह्मणजेही चित् नव्हे. चित् हैं। मिश्ररूप झालें, ह्मणजे ते विवेचकबुद्धि अथवा उपजतबुद्धि इत्यादि रूपाने प्रत्यक्ष प्रत्ययाला येते. चित् मर्यादित झालें ह्मणजे त्याला अंतर्ज्ञान अथवा अंतःस्फूर्ति असे नांव आपण देतो. ही मर्यादा अधिक वाढली ह्मणजे त्या अधिक मर्यादित स्वरूपाला आपण विवेचकबुद्धि असे ह्मणतो; हीच मर्यादा त्याहून अधिक वाढून चित्चे स्वरूप अधिक आकुंचित झालें, ह्मणजे त्या स्वरूपाला आपण उपजतवुद्धि या नांवाने ओळखतो. या चित्ला विज्ञान असें नांव वेदान्ताने दिले आहे. विज्ञान में केवलरूप आहे. त्यांत कशाचेही मिश्रण नाहीं. विज्ञानरूप में पुरुषाचे स्वभावरूप आहे. पुरुष केवलरूप आहे आणि विज्ञानहीं केवलरूप आहे. यामुळे ती दोघेही एकमेकांची स्वभावरूपें आहेत. त्याचप्रमाणे आनंदरूप मर्यादित झालें, ह्मणजे त्याला आपण प्रेम या नांवाने ओळखतो. यांत सुंदर स्थूलदेहावरील प्रेमाचा अथवा सूक्ष्म देहावरील प्रेमाचा अंतर्भाव होतो. स्थूलदेहाचे सौंदर्य पाहून त्यावर कोणाचे प्रेम जडेल अथवा दुस-या एखाद्याचे प्रेम एखाद्या सुंदर विचाराशी संलग्न होऊन राहील. हे आनन्दरूपाचें वस्तूने मर्यादित झालेले रूप होय. प्रेम हें आनंदरूपाचे विकृत झालेलें रूप आहे. पुरुषाचे हेही स्वभावरूप आहे. आनंद हा पुरुषाचा गुण नसून त्याचा तो स्वभावच आहे. पुरुष आणि आनंद ही पूर्णपणे अविभाज्य आहेत. त्यांची जोडी कधीही फुटावयाची नाहीं. सत्, चित् आणि आनंद हे पुरुषाचे गूण नसून, ते त्याचे स्वभावरूप आहेत. त्यांत आणि पुरुषांत-आत्म्यांत-कसल्याही प्रकारचा निराळेपणा नाही. ही सर्व एकरूप आहेत. मूळ एकच वस्तु असून ती, तीन निरनिराळ्या स्वरूपांनी आपल्या प्रत्ययाला येते. आपण ज्याला ज्ञान असें ह्मणतो त्याच्या पलीकडचें हें स्वरूप आहे. ते आपल्या ज्ञानाने जाणता येणार नाही. त्या स्वरूपाचे प्रतिबिंब प्रकृतींत पडले ह्मणजे बुद्धि इत्यादिद्वारा प्रकृति ज्ञानरूप दिसू लागते.
 मनुष्याच्या मनाच्या द्वारानें जें चिद्रूप प्रकट होते, त्याला आपण बुद्धि या नांवाने ओळखतो. या ठिकाणी आत्म्याचा प्रकाश, मध्यस्थाच्याद्वारे व्यक्त