पान:विवेकानंद.pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ३ रें.

१४१


अधिक मिश्र होतों, तसतसा मूळ भावनेचा लोपही अधिक प्रमाणावर होऊ लागतो. 'आनंद' या भावनेचा जसजसा लोप होत जातो, तसतसे दुःख तेथे प्रवेश करू लागते. जडपदार्थाचे मिश्रण कमी होऊ लागले म्हणजे, मूळ पदार्थांचा प्रत्यय अधिक स्पष्ट होऊ लागतो व त्या स्थितीला आपण 'सुख' असे म्हणतो.
 ‘सत्-चित्-आनंद' हा जसा आपल्या अस्तित्वाचा पाया आहे, त्याचप्रमाणे एकंदर अस्तित्वाचाही तोच पाया आहे. प्रत्येक मनुष्य असतो', * जाणतो' आणि 'आनंदरूप ' असतो. तसे नसणे ही गोष्ट मूलतःच अशक्य आहे. हा मूळ पाया नसेल तर मनुष्याचे अस्तित्वच शक्य नाहीं. हीच गोष्ट सर्व सृष्टीलाही लागू आहे. झाडेझुडपे आणि पशुपक्षी यांच्या अस्तित्वाचा मूळ पायाही * सत्-चित्-आनंद' हाच आहे. त्या सर्वांत या त्रयीचा वास असलाच पाहिजे. त्यांतील चिदानंदाचा प्रत्यय तुह्माआह्मांला आला नाही, तरी त्या सर्वात अस्तित्व, चैतन्य आणि आनंद ही आहेतच.. याकरितां जें जें कांहीं अस्तित्वात आहे त्याचे शास्त्रीय स्वरूप 'क्ष' + ‘चित्ताचा अंश' हे असून, त्याचे जे कांहीं ज्ञान आपणांस होते त्याचे स्वरूप * ब'+चित्ताचा अंश' असे आहे. त्याचप्रमाणे सुख अथवा आनंद या भावनाही 'ब' आणि चित्ताचा अंश मिळून झाल्या आहेत. ‘सत-चित्आनंद' ही त्रयी अंतर्गत असून, ती बाह्यवर्ती होऊन बाह्यवस्तूशी मिळून बाह्यजग निर्माण करते. या त्रयीलाच • सच्चिदानंद' असे नांव वेदान्ती देतात.
 जेव्हां हैं अस्तित्व केवळ ‘सत्-रूप' असते-जेव्हां त्याचा दुस-या कोणत्याही बाह्यवस्तूशीं मिलाफ झालेला नसतो, तेव्हा त्याचे स्वरूप केवलरूप' हेच असते. त्या स्वरूपाला, दुस-या कोणत्याही पदार्थाच्या संगतीने मर्यादा पडलेली नसते; ते अमर्याद स्वरूप असते. मुक्त पुरुषाचे-आत्म्याचेंहेच रूप होय. या स्वरूपाशी प्रकृतीच्या तत्त्वांचा संकर झाला, ह्मणजे मनुष्यप्राणी निर्माण होतो. प्रकृतीच्या पदार्थांच्या संयोगामुळे अमर्यादाला मर्यादा उत्पन्न होते. मूळचे अमर्याद केवलरूप मर्यादित होते. अशाच रीतीने प्रकृताच्या अनेक प्रकारच्या मर्यादा निर्माण होऊन, त्यांतून झाडेझुडपें, पशुपक्षी आणि मनुष्यप्राणी निर्माण झाले आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या अफाट मैदा