पान:विवेकानंद.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१४०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


आपणांस मुळीच नाही. यांचे उदाहरण घेऊन आपण असे सिद्ध केलें कीं, ज्ञान ही मिश्रवस्तु आहे. ती निर्माण केलेली चीज आहे. ज्याप्रमाणे बाह्यविश्वाचे ज्ञान निर्मित आहे, त्याचप्रमाणे बुद्धयादि अंतःसृष्टीचे ज्ञान हीसुद्धा निर्मित वस्तूच आहे. अंतर्गत सृष्टीचे ज्ञान हे 'ब' + * चित्ताचा अंश, आणि बाह्यविश्वाचे ज्ञान हे 'क्ष' + * चित्ताचा अंश, असे आपण ठरविलें. आतां आपण प्रथम अंतःसृष्टीवद्दल विचार करू. बुद्धि हें नांव ज्या विशिष्ट वस्तूला आपण दिले आहे, ती केवळ जडप्रकृतीपासूनच निर्माण झाली असे म्हणता येत नाहीं; कारण, बुद्धि ही मिश्रवस्तूच आहे. तीत ‘ब' + * चित्ताचा अंश ' असे दोन पदार्थ आहेत. यांपैकी ‘ब' हे स्वरूप पुरुषाचे अंशभूत आहे. बुद्धि ही प्रकाशक वस्तु आहे. तींत जो प्रकाशाचा अंश आहे तो पुरुषाचा अंश असून, तिच्यांतील जडत्व हा प्रकृतीचा अंश आहे. त्याचप्रमाणे विश्वाचे अस्तित्व' ही संज्ञा ज्या ज्ञानाला आपण लावतों, ते ज्ञानही 'क्ष' + ‘चित्ताचा अंश' या मिश्रणांतूनच निर्माण झाले असले पाहिजे. आपल्या एकंदर आयुष्यक्रमाचे परीक्षण केले, तर त्यांत तीन मुख्य स्थिती आढळून येतात. ज्या स्थितींचा आपणांस कधीही विसर पडत नाहीं अशा स्थिती तीन आहेत. त्यांपैकी मी 'आहे' ही एक स्थिति आहे. माझ्या अस्तित्वाबद्दल माझी पूर्ण खात्री सदोदित असते. दुसरी स्थिति, मला ‘समजतें' ही आहे. मला ज्ञान आहे ही भावनाही माझ्यांत सदोदित जागृत असते. तिसरी स्थिति, मी ‘सुखरूप आहे' ही होय. मला कशाचीही गरज नाहीं अशी भावना क्षणोक्षणी आपल्या चित्तांत उद्भूत होत असते. या तीन भावनांच्या मूळपायावर आपल्या साच्या आयुष्याची इमारत आपण बांधीत असतो. 'मी अमुक करीन’, ‘तमुक भोगीन', असे आपण म्हणत त्यावेळी, तसे करण्यास मी स्वतंत्र' आहे अशी भावना, या विचारांच्या पोटीं सदोदित अंतर्भूत झालेली असते. आपल्या आयुष्यक्रमाचा पाया, ‘सत्-चित्आ नंद' हाच आहे; असे आहे तर आपल्या आयुष्यक्रमांत आपणांस दु:ख होतें तें कां ? याचे कारण असे आहे की, ज्या प्रमाणाने आपण आपलें हें मूलरूप सृष्टपदार्थोशी–प्रकृतीशी-मिश्र करतो, त्या प्रमाणाने त्याचा अनुभव कमी होतो, आणि त्या मिश्रस्थितीला आपण दुःख असे म्हणतों. मी ‘सत्-चित्आ नंद' ही मूळ भावना सोडून, आपण सृष्टपदार्थाशीं-जडप्रकृतीशी–जसजसे ,