पान:विवेकानंद.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ३ रें.

१३९


किती असतो याचा निर्णय निरीक्षणाने करण्यांत आला आहे. मोत्यांची उत्पत्ति कशी होते हे आपणांस माहीत असेलच. समुद्रांतील एखादा कठीण पदार्थ शिंपलींत गेला, म्हणजे आंतील किडा एक प्रकारचा चिकट रस बाहेर टाकतो. मोती बनण्यास दोन प्रकारच्या क्रियांची अपेक्षा असते. एक बाह्यपदार्थ शिंपलीत शिरणे; आणि दुसरी किड्याने रस बाहेर टाकणे; या दोन क्रियांच्या एकत्र परिणामापासून मोती बनते. त्याचप्रमाणे आपले बाह्यपदार्थांचे ज्ञानही दोन प्रकारच्या क्रियांवर अवलंबून आहे. बाह्यवस्तूने चित्तांत प्रवेश करणे; आणि अंतर्गत चित्ताने प्रतिक्रिया करणे; या दोन संवेदनांच्या मिलाफापासून बाह्यवस्तूच्या ज्ञानाची उत्पत्ति होते. आतां येथे आणखीही एक गोष्ट विशेषेकरून लक्ष्यांत ठेवण्यासारखी आहे. बाह्यवस्तु काय आहे हे समजण्याची खटपट चित्त करू लागले म्हणजे, आपल्या स्वतांतील कांहीं अंश ते पदार्थाकडे पाठविते. बाह्यपदार्थाची संवेदना चित्ताकडे गेल्याबरोबर त्याचा प्रवाह त्या पदार्थाकडे वाहू लागतो. अशा रीतीने बाह्यपदार्थाची संवेदना, व त्यांत मिळालेला चित्ताचा अंश, यांचे मिश्रण झाल्याबरोबर तो पदार्थ अमुक, असे ज्ञान तेथे निर्माण होते; यावरून ज्ञान हे मिश्ररूप आहे असे सिद्ध होते. हीच गोष्ट अंतर्गत वस्तूंच्या ज्ञानालाही लागू आहे. 'मी' म्हणजे कोण, याचे ज्ञान आपणांस करून घ्यावयाचे आहे अशी आपण कल्पना करूं. 'मी' असे म्हणणारा या देहांत कोण आहे हे आपणांस माहीत नाहीं; आणि ते माहीत करून घेण्याचे कांहीं साधनही आपणांस उपलब्ध नाही. या अंतर्गत * मी' ला आपण 'ब' असे म्हणू. मी अमुक ‘राजश्री' असे मला स्वतःबद्दल म्हणावयाचे असले, तर त्यावेळी आंतील ‘ब, आणि चित्ताने केलेल्या प्रतिक्रियेच्याद्वारा आलेला चित्ताचा अंश, यांचा संयोग झाला पाहिजे. मी कोण असा प्रश्न उपस्थित झाल्याबरोबर 'ब' चा आघात प्रथम चित्तावर जाऊन आदळतो, त्या क्रियेला चित्तांतून प्रतिक्रिया सुरू होते, आणि ही दोन्ही मिळून मी अमुक गोमाजी' असे आपण म्हणतों. यावरून बाह्यविश्वाचे ज्ञान म्हणजे, 'क्ष' + चित्ताचा अंश'; आणि अंतर्गत सृष्टीचे ज्ञान म्हणजे, ‘ब' + * चित्ताचा अंश'; हेच आहे असे सिद्ध झाले. अद्वैतमत गणितानेही कसे सिद्ध होते याचा विचार आपण पुढे करूं.
 'क्ष' आणि 'ब' या अक्षरांची योजना आपण उदाहरणार्थ केली. या दोन बीजगणितांतील अज्ञात वस्तू आहेत. या ‘अमुक' असें आगाऊ ज्ञान