पान:विवेकानंद.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

खंड.]

|

वेदांतमताचें सामान्य निरीक्षण.

द्वारा मनास जें ज्ञान प्राप्त होते ते ज्ञान मन बुद्धीकडे पोहोचविते. बुद्धि ह्मणजे मनाचेच निश्चयात्मक स्वरूप. बाह्यवस्तूंची निवडानिवड करून ही वस्तु अमुक असा निश्चय करणें हें बुद्धीचे कार्य आहे. हा पदार्थ अमुक असा बुद्धीचा निश्चय झाला ह्मणजे तो निश्चय बुद्धि मनाकडे परत पाठविते आणि त्याचवेळीं पुरुष-आत्मा-अहंकाररूप होऊन मनाकडे धाव घेतो. इतकी परंपरा पूर्ण झाली ह्मणजे ‘अमुक वस्तूचे ज्ञान मला झाले' असे आपण ह्मणतो. विश्वांतील प्रत्येक वस्तूंत प्रत्येक क्षणीं बदल सुरू आहे ही गोष्ट अर्वाचीन भौतिक शास्रांस मान्य झाली आहे. विश्वांतील प्रत्येक वस्तु आस्थर-केवळ स्पंदरूपआहे असा सिद्धांत आमच्या आर्यतत्त्वज्ञांनीही स्थापित केला आहे. या बाबतींत आमच्या प्राचीन आणि सध्याच्या भौतिकशास्त्रांची एकवाक्यता आहे. ज्याप्रमाणे बाह्य विश्वातील प्रत्येक वस्तु स्पंदरूप आहे त्याचप्रमाणे आमचे शरीर, मन आणि बुद्धि ही सुद्धा स्पंदरूपच आहेत. यांच्या घटकांतहि प्रत्येक क्षणीं बदल सुरू आहे. बाह्यवस्तूंचे स्पंद, मन आणि बुद्धि यांच्या द्वारा ज्या मूळरूपाकडे जातात ते मूळरूपहि अस्थिर असेल तर हा पदार्थ अमुक' असा निश्चय करणे आपणांस शक्य नाही. कारण ज्याचा निश्चय करावयाचा तो पदार्थ अस्थिर, आणि ज्याने निश्चय करावयाचा ते मूळरूपअधिष्ठानही-अस्थिर. अशा अस्थिर अवस्थेत निश्चय करणे शक्य नाही. या वरून बाह्य पदार्थाचे स्पंद जेथे चित्रित होतात ते मूळ अधिष्ठान स्थिर असले पाहिजे हे उघड आहे. या स्थिर अधिष्ठानास पुरुष-आत्मा-असे नांव -सांख्यांनी दिले आहे.
मनुष्यमात्रांत बुद्धिरूपाने व्यक्त होणारे तत्त्व महत्तत्त्वाचेच एक व्यक्त रूप आहे असा सांख्यांचा सिद्धांत आहे. महत्तत्त्व ह्मणजे विश्वांतील व्यक्त बुद्धीचें समवायी अथवा मूळरूप असा अर्थ समजावा. महत्तत्व स्पंदरूप झालें ह्मणजे ते विचाररूप धारण करते. विचारस्पंदांपैकी कांहींचे रूपांतर इंद्रियादि सूक्ष्म पदार्थांत होते व बाकीच्या पदांचे रूपांतर होऊन त्यांतून जड पदार्थाचे परमाणू निर्माण होतात. अशा रीतीने एकाच महत्तत्त्वांतून हैं। सारे विश्व नटलें आहे. जींतून हे महत्तत्व निर्माण होते त्या स्थितीस अव्यक्त अथवा प्रकृति असे नांव सांख्यांनी दिले आहे. प्रकृतीच्याहि पलीकडे व तिजपासून अगदी भिन्न असे पुरुषाचे रूप आहे असे सांख्यमत आहे. पुरुष