पान:विवेकानंद.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण ३ रें.

१३५


शरिराचे-सूक्ष्मदेहाचे-धर्म आहेत. जाणे आणि येणे या क्रिया, लिंगशरीरच करू शकते.
 पुरुष हा अमर्याद आहे आणि प्रकृतींतून उत्क्रांत न झालेला असा तोच एक आहे, असे श्रीकपिलांच्या अंतःसृष्टिशास्त्रांतील सिद्धांतावरून आपणांस आढळून येते. प्रकृतीच्या मर्यादेबाहेर असा, फक्त पुरुषच असून तो प्रकृतीनें बद्ध झाल्यासारखा दिसतो. पुरुषाच्या सर्व बाजूंनी प्रकृतीचे रूप पसरले असल्यामुळे तोही प्रकृतीसारखा दिसू लागतो; इतकेच नव्हे, तर मी प्रकृतीच आहे असाही भ्रम त्याला होतो. मी लिंगशरीर आहे, मी जडदेह आहे, असा भ्रम त्याला होतो; आणि या भ्रमामध्ये असतां तो भोक्ता होऊन सुखदुःखादि भोग भोगतो; तथापि सुखादि भोग हे पुरुषाचे धर्म नव्हत. ते वस्तुतः लिंगदेहाचे व स्थूलदेहाचे धर्म आहेत. एखाद्या विशिष्ट ज्ञानतंतूवर आघात झाला असतां आपणांस दुःख होते, आणि त्याची संवेदनाही त्या तंतूच्या द्वारा आपणांस समजते. आपल्या एखाद्या बोटांतील ज्ञानतंतू कांहीं कारणाने जर अक्रिय झाले, तर ते बोट कापलें असतांही आपणांस दुःख होणार नाहीं; कारण, तेथील ज्ञानतंतूंच्या क्रियेच्या अभावामुळे तेथे घडलेल्या क्रियेची संवेदना मेंदूकडे रवाना केली जात नाहीं. शरिरावर एखाद्या घट्टा पडलेल्या जागी सुई टोंचली असतांही त्याची नोंद मनावर होत नाहीं. यावरून सुख अथवा दुःख हे इंद्रियांचे ( Nerve-centres ) धर्म आहेत हे प्रसिद्ध होते. माझी दृष्टि नाहींशी झाली, तर बयावाईट देखाव्यापासून उत्पन्न होणारे सुखदुःख मला होणार नाही. यावरून सुख आणि दुःख हे आत्म्याचे धर्म नसून, ते मनाचे व देहाचे धर्म आहेत हे सिद्ध होते. | पुरुषाला-आत्म्याला-सुख अथवा दुःख यांपैकी कोणीच स्पर्श करू शकत नाहींत. तो या सर्वाचा साक्षी मात्र आहे. त्याजभोवती प्रकृतीच्या अनेक प्रकारच्या क्रिया सुरू असून, त्यांजपासून उद्भवणारी फळे तो घेत नाहीं; पण या सर्व क्रिया, त्याच्या साक्षित्वामुळे घडत आहेत. सूर्यो यथा सर्वलोकस्य चक्षुर्न लिप्यते चाक्षुषैर्बाह्यदोषैः। एकस्तथा सर्वभूतांतरात्मा न लिप्यते लोकदुःखेन बाह्यः ॥” ( कठोपनिषत् २. २. ११). सूर्य हा सर्व लोकां• च्या दृष्टीचे कारण असूनही त्यांच्या दृगिंद्रियांतील दोषांनीं तो जसा लिप्त होत नाही, त्याचप्रमाणे पुरुषही दु:खानें लिप्त होत नाही. ज्याप्रमाणे तांबड्या