पान:विवेकानंद.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१३०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

ते उत्तर आपण शोधू लागलों म्हणजे त्यांतच वेदान्ताचा पायाही आपणांस आढळून येईल. आम्हांला पहिली शंका अशी येते की, जगांत दोन अनंत पदार्थ एकत्र असू शकतील काय ? असूनही आम्ही सर्वव्यापक सिद्धांतापर्यंत पोहोंचलों नाहीं अशी शंका आम्हांला येते. यामुळेच आमच्या सर्व शंकांचे पूर्ण निवारण झाले असे म्हणता येत नाही. आमच्या या सर्व शंकांचे निवारण वेदान्ती कसे करतात, या भयंकर अडचणींतून ते सरळ मार्ग कसा काढतात व शेवटीं ते सर्वव्यापी सिद्धांताची स्थापना कशी करतात, याचा विचार आपण पुढे करूं. वेदान्ताचे साम्राज्य विश्वव्यापी असले, तरी त्याचे सारें श्रेय श्रीकपिलांना देणेच योग्य आहे. सर्व इमारत पुरी झाल्यानंतर वर रंग वगैरे देऊन ती पूर्ण करणे, याला कांहीं मोठ्या कुशलतेची आवश्यकता नाहीं.