पान:विवेकानंद.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

आहे; पण तो बुद्धि नव्हे अथवा तो जाणतो असेंही ह्मणतां येत नाहीं; कारण, जाणणे हा सुद्धा विकारच आहे; यासाठीं तो जाणतही नाहीं; तथापि ज्ञान होणे ही क्रिया घडावयास कारण तोच आहे. पुरुषांतील चित् आणि प्रकृति यांच्या मिश्रणानें वुद्ध आणि अहंकार हीं बनली आहेत. विश्वांतील आनंद आणि ज्ञान ही पुरुषाचींच आहेत; तथापि आनंद आणि ज्ञान या भावनाही मिश्ररूप आहेत. प्रकृति आणि पुरुष यांच्या संयोगापासूनच त्यांची उत्पत्ति झाली आहे. "परम आनन्द एतस्यैवानन्दस्यान्यानि भूतानि मात्रामुपजीवंति ।( बृहदारण्यकोपनिषत् ४. ३. ३२ ) तो परमानंदरूप आहे. विश्वांत जेथेंजेथे आनंद-सुख-आढळून येते, त्या त्या ठिकाणीं तो आनंदरूप पुरुषाचा स्फुलिंग आहे असे समजावे. या विश्वांतील सर्व वस्तूंचे लक्ष्य पुरुष हाच आहे. सर्व विश्व त्याकडेच धांव घेत आहे. विश्व त्याला स्पर्श करू शकत नाही अथवा त्याजवर कांहीं परिणामही करूं शकत नाहीं; तथापि सर्व विश्वाचे साध्य-सर्व विश्वाच्या आवडीचा पदार्थ-तोच, आहे. एखाद्या मनुष्याला सोन्याचे वेड असते. वाटेल त्या रीतीने सोने मिळवावे, त्याचा संग्रह करावा, आणि त्याच्या दर्शनाने सुख पावावे, असे एखाद्याला वाटत असते. याचे कारण इतकेच की, त्या सोन्याच्या ठिकाणी जें पुरुषाचे तेज वास करीत आहे, त्या तेजाचे वेड त्याला लागलेले असते; परंतु ते त्याचे त्यालाच कळत नसते. कांहीं माणसे मुलासाठीं वेडी झालेली आढळतात. मूल नाहीं ह्मणून सर्व जग त्यांना तुच्छ वाटत असते. एखादी स्त्री प्रेमी मनुष्यासाठी वेडी होते. अशा ठिकाणीसुद्धा तोच पुरुष या प्रेमाच्या ‘पदार्थांच्या मागे असतो. जेथे पुरुषाची व्याप्ति नाहीं असे एकही ठिकाण या विश्वांत नाही. बाह्यतः अत्यंत जड ह्मणून वाटणाच्या प्रत्येक पदार्थांतही त्याचा वास आहे. आपली दृष्टि सूक्ष्म नसल्यामुळे बाह्य जडांशांतच ती गुंतून राहते; आणि यामुळेच पुरुषदर्शन आपणांस होत नाहीं. " नित्योऽनित्यानां चेतनचेतनानाम् ।” (कठोपनिषत् ५. १३). असे त्याचे स्वरूप आहे. जड विश्वां• तील चेतन तो आहे. सांख्यशास्त्राने पुरुषाचे वर्णन या प्रकारे केले आहे. या वर्णनाप्रमाणे पाहतां पुरुष सर्वव्यापी असला पाहिजे असे उघड अनुमान होते. कारण, जें सर्वव्यापी नाहीं तें समर्याद असलेच पाहिजे. प्रत्येक समर्याद पदार्थ कारणापासून उत्पन्न झालेला असतो. तो कार्यरूप असतो; आणि