पान:विवेकानंद.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


मिश्ररूप प्रकृतीपासून निर्माण झालेले आहे. इच्छेमुळे प्रकृति निर्माण झालेली नाही. याकरितां परमेश्वराच्या इच्छेनें विश्व निर्माण झाले हे म्हणणे तर्कशास्त्राला संमत नाही. केवळ पिंडापुरता विचार केला, तर इच्छा हा अहंकाराचा एक लहानसा भाग आहे असे आपल्या लक्ष्यांत येईल. इच्छेमुळे आपल्या मेंदूत चलनवलन उत्पन्न होते असे कित्येक म्हणतात; पण हे म्हणगेंही चुकीचे आहे. तसे असते तर आपल्या इच्छेप्रमाणे मेंदूची क्रिया आपणांस बंद करतां आली असती. ती तशी बंद करतां येत नाहीं त्याअर्थी त्या क्रियेचे इच्छा हैं कारण असणे संभवत नाही. आपलें हृदय उडविण्याची क्रिया कोण करतो ? ती क्रियाही इच्छेमुळे उद्भवलेली नाहीं; कारण, तसे असते तर आपले हृदयही आपणांस आपल्या इच्छेप्रमाणे थांबविता आले असते. केवळ आपल्या इच्छेमुळे आपल्या शरिरांतील हालचाली होतात असे नाही. आपल्या शरिरांत अनेक हालचाली सुरू ठेवणारी जी कांहीं शक्ति आहे, तिच्या अनेक अंगांपैकी इच्छा हेही एक अंग आहे. आपल्या शरिराला चलनवलन देणारी शक्ति प्रकट होण्याची जी अनेक द्वारे आहेत, त्यांपैकी इच्छा हेही एक द्वार आहे. ज्याप्रमाणे पिंडांत इच्छेचा वास आहे, त्याचप्रमाणे ब्रह्मांडांतही इच्छेचा वास आहे; पण ती इच्छा म्हणजे ब्रह्मांडाच्या अनेक अंगांपैकी एक अंग मात्र आहे. इच्छेने हे सारे विश्व नियंत्रित होत नाही. यामुळे इच्छेच्या उपपत्तीने विश्वाच्या कोड्याचा उलगडा होणे शक्य नाही. माझ्या इच्छेनेच माझा देह चालतो असे आपण समजूं. अशा वेळी माझ्या देहांत जर कोठे कमीअधिकपणा झाला, तर तो माझाच अपराध नव्हे काय ? अशा वेळी जर मी अकांडतांडव करू लागलो तर तसे करणे आपण न्याय्य म्हणाल काय? त्याचप्रमाणे केवळ इच्छेमुळेच विश्व निर्माण झाले, आणि ते इच्छेनेच चालले आहे असे म्हटले, तर त्यांतील कमीअधिकपणाबद्दल तक्रार करावयाला जागा कोठे राहिली ? किंबहुना त्यांत कमीअधिकपणा पाहणे हा माझाच अपराध नव्हे काय? इच्छा हैं पुरुषाचे रूप नव्हे, अथवा बुद्धि हेही त्याचे रूप नव्हे; कारण, बुद्ध हे मिश्ररूप आहे. बुद्धि ही जडपदार्थाच्या संयोगावांचून उत्पन्न होऊ शकत नाहीं. पिंडांतील हा जडपदार्थ म्हणजे मेंदू हाच होय. ज्या ज्या ठिकाणी कोणत्याना कोणत्यारूपाने बुद्धि उत्पन्न झाल्याचे आढळून येते, तेथे जडपदार्थ असलाच पाहिजे. या दोहींची संलवस्थाच नेहमी आढळून येईल. असे असतां पुरुष हा बुद्धिरूप होईल हैं।