पान:विवेकानंद.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण २ रें.

१२३


ताडून पाहण्यास, त्याच्या जातीचा कोणताच पदार्थ आपल्या चित्तांत तयार नसतो. यामुळे विश्व ह्मणजे एक मोठे कोडे आहे असे आपणांस वाटत असते. कारण, ज्ञान ह्मणजे ताडून पाहण्याची क्रिया. ही क्रिया संपादण्यास विश्वाच्या जातीचे अनेक पदार्थ आपल्या मनांत तयार असावयास पाहिजेत; पण तसे नसल्यामुळे आपल्या विवेचक्रबुद्धीचीही गडबड उडते व ती अगदी गांगरून जाते यांत नवल काय ? विश्वाच्या एखाद्या भागाकडे-जगाकडेपाहून त्याचे ज्ञान करून घ्यावयाचे असा विचार उद्भूत झाल्याबरोबर आपली विवेचकबुद्ध पुढे सरसावून, त्याच्याशी साम्य असलेले पदार्थ चित्तांत कोठे आहेत याचा शोध करू लागते; आणि तसे पदार्थ तिला सांपडले नाहींत ह्मणजे तिची तारांबळ उडते व ती अधिकाधिक धावाधाव करू लागते. बुद्धीच्या अशा स्थितीत जग दुष्ट आहे, वाईट आहे, भयप्रद आहे, असे आपण ह्मणं लागतो. जग चांगले आहे असेही आपण केव्हांकेव्हां ह्मणतो; तथापि एकंदरीने ते अपूर्ण आहे अशी आपली खात्री असते. विश्वाशीं सदृश असे पदार्थ आपल्या चित्तांत आपणांस सांपडले, तर विश्वाचे समाधानकारक ज्ञान आपणांस करून घेता येईल. ही स्थिति प्राप्त करून घेणे असेल, तर आपणांस विश्वाच्या बाहेर गेले पाहिजे. त्याचप्रमाणे या लहानशा देहांत भासमान् होणा-या अहंकारापलीकडेही आपणांस गेले पाहिजे. ही दोन्ही मागे टाकून ज्यावेळी आपण पलीकडे जाऊं, त्याचवेळी या विश्वाच्या कोड्याचा उलगडा आपणांस होईल. विश्वाने घालून दिलेल्या मर्यादेबाहेर आणि या क्षुद्र अहंकारापलीकडे जाण्याची विद्या साध्य होईपर्यंत या कोड्याचा उलगडा होणे नाहीं. तोंपर्यंत वाकीच्या कितीही खटपटी आपण केल्या तरी त्या व्यर्थ होतील. ज्ञान ह्मणजे चित्तांतील सदृश वस्तूंशी साम्य सांपडणें हेंच. आपल्या देहांत प्रत्ययास येणारे अहंकारी चैतन्य हा महत्तत्त्वाचा एक स्फुलिंगमात्र आहे. अशा स्थितीतं विश्वाचा एखादा लहानसा भाग मात्र तद् द्वारा आपल्या प्रत्ययाला येतो. त्याचप्रमाणे ज्यांतून हे सारे विश्व उदित झाले आहे, ते महत्तत्त्व अथवा सामान्य भाषेत ज्याला आपण परमेश्वर या नांवाने ओळखतो, त्याचेही ज्ञान सध्याच्या स्थितींत सामग्येंकरून आपणांस होत नाहीं. आपल्या सा-या खटपटीने त्याची जी कांहीं प्रतिमा आपण पाहतो ती अगदी अपु-या स्वरूपाची असते. मनुष्यप्राणी ह्मटला ह्मणजे तो मर्यादित