पान:विवेकानंद.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

‘एक मोठे कारण आहे. आमच्या प्राचीन आर्यतत्त्ववेत्त्यांचें ह्मणणें असें आहे कीं, आपल्या भोवती जी कांहीं परिस्थिति असते ती आपणच निर्माण केलेली · आहे. आपल्या स्वतःच्या पूर्वसंस्कारांस अनुसरून ही परिस्थिति बनलेली आहे. थोडक्यांत इतकेंच सांगावयाचें कीं, आपल्या परिस्थितीशी अथवा दान- तीशीं दुसऱ्यांच्या संस्कारांचा यत्किंचितही संबंध नसून ती आपल्याच संस्कारानुरूप झालेली आहे.
 ज्ञान या शब्दाचा शास्त्रीय दृष्ट्या काय अर्थ आहे हे आतां आपल्या लक्ष्यांत आलेच असेल. पूर्वानुभवाशीं नवा अनुभव ताडून पाहणें या क्रियेला ज्ञान अशी संज्ञा आहे. नवी प्रतिमा जुन्या प्रतिमांशी ताडून पाह- ण्याची आपली किया सदैव चालू असते; नवीचें साम्य जुन्याशीं आढ- -ळून आलें ह्मणजे नव्या प्रतिमेची ओळख आपणांस पटली असें होतें. नव्या प्रतिमेची अगर अनुभवाची ओळख जुन्यांच्या द्वारें पटणें याचेंच नांव ज्ञान. ज्ञान या शब्दाला याहून अधिक अर्थ नाहीं. असे असेल तर एका प्रतिमेचें पूर्ण ज्ञान करून घेण्यासाठीं तिच्याच जातीच्या दुसन्या अनेक प्रति -मांशी ती ताडून पाहावयास नको काय ? असें करणें हें अवश्यच आहे; कारण, तसें न केलें तर आपलें पूर्ण समाधान व्हावयाचें नाहीं. आपण असें समजूं की, एक गोटी आपल्या अवलोकनांत आली; आतां तिचें सांगोपांग - ज्ञान आपणांस करून घ्यावयाचें असेल, तर आपल्या चित्तांतील अनेक गोठ्यांच्या मालिकेशी ती आपण ताडून पाहतों; त्यांच्याशी असलेले तिचें -साम्य अथवा वैषम्य यांचा विचार आपण करतों; आणि शेवटीं ती वस्तु अमुक अशी आपली खात्री झाली हह्मणजे आपलें समाधान होतें. रोजच्या संवयीमुळे हे निरनिराळे दुवे आपल्या लक्ष्यांत येत नाहींत; पण ही सारी क्रिया प्रत्येक वेळी याप्रमाणेंच घडत असते.
 आतां आपण आपल्या पूर्वीच्या प्रश्नाकडे वळूं. विश्वांत अपूर्णता का आढळते याच्या शोधार्थ आपण निघालों होतों, हें आपणांस आठवत असेलच. आपण विश्वाबद्दल विचार करूं लागलों असतां तें अनेक प्रकारें अपूर्ण आहे असें आपणांस वाटत असतें. याचें कारण असे की, या विचाराला सुरवात झाली ह्मणजे विश्वाचं व्यक्तरूप तेवढेच आपल्या मनश्चक्षूंपुढे दिसूं लागतें. त्याचें अगोदरचें अथवा नंतरचें रूप आपल्या ध्यानांत येत नाहीं; यामुळे त्याच्याश