पान:विवेकानंद.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण २ रें.

१२१


पंडित यांनाही ही गोष्ट बहुतांशी पटली आहे. पूर्वज्ञानाचा सांठा अगोदर तयार असल्याशिवाय नवी ज्ञानप्राप्ति करून घेणें शक्य नाहीं; आणि याच करितां मूल जन्माला येतें त्यावेळी ज्ञाननिधि तें बरोबर घेऊन येतें असें त्यांचेंही मत आहे. कारण आणि कार्य हीं सदैव एकरूप असतात. कारणाचे धर्म आणि कार्याचे धर्म यांत गुणमूलक फरक कधींही असत नाहीं. अदृश्य अथवा सूक्ष्म स्थितीतील पदार्थाचें रूपांतर होऊन तो व्यक्त अथवा स्थूल झाला ह्मणजे पहिल्याला कारण आणि दुसऱ्याला कार्य अशीं नांवें आपण देतों. नांवें निराळी झाली तरी त्यामुळे त्यांच्यांतील धर्मात कांहीं बदल होतो असें नाहीं. हा सिद्धांत स्पेन्सर व तदनुयायी इतर पंडित यांनी कबूल केला आहे. आतां पाश्चात्य पंडितांच्या व आमच्या प्राचीन आर्यतत्त्वज्ञांच्या मतांत जो फरक- उरला आहे तो इतकाच कीं, मूल जन्माला येतांना जे पूर्वानुभव तें बरोबर घेऊन येतें ते अनुभव त्याला आनुवंशिक संस्कारांनी प्राप्त झालेले असतात असें पाश्चात्य पंडितांचें मत आहे. ते त्याचे स्वतःचे पूर्वानुभव नसून, त्याच्या. आजापणजाला जे अनुभव प्राप्त झालेले असतात तेच परंपरेनें मुलापर्यंत उतरतात असे त्यांचें ह्मणणें आहे; पण हे त्यांचें ह्मणणे चुकीचें आहे असे निःसंशयपणें ठरण्याची वेळ लवकरच येईल; किंबहुना या आनुवंशिक संस्का-रांच्या उपपत्तीवर निकराचे हल्ले आजच त्यांपैकी कित्येक करूं लागले आहेत. आनुवंशिक संस्कारांची उपपत्ति ठीक आहे; पण ती अपुरी आहे. आजा- पणजाचे संस्कार मुलापर्यंत येतात ही गोष्ट खरी; पण ती कायिक संस्कारांस मात्र लागू आहे. देहरचनेचें विशिष्टत्व, पणजाकडून आजाकडे, आजाकडून. बापाकडे व बापाकडून मुलाकडे याप्रमाणे परंपरेनें प्राप्त होते ही गोष्ट खरी आहे; पण ही परंपरा मानसिक संस्कारांस मात्र लागू पडत नाहीं. मनुष्याची वर्तणूक त्याच्या आजूबाजूच्या परिस्थितीला धरून असते असें आपण नित्य पाहतों. त्याच्या दानतींतील विशिष्ट संस्कार परिस्थित्यनुरूप जागृत झालेले असतात असा आपणांस नित्य अनुभव येतो. जर त्याची दानत त्याला आनु वंशिक संस्कारांस अनुसरून प्राप्त झाली असेल, तर तिच्यांत परिस्थितीला अनुसरून फेरबदल कां व्हावा ? मुलाच्या दानतींत फक्त त्याच्या आजा-- पणजाचेच विशेष गुण कां दिसत नाहींत ? अनेक प्रकारच्या कारणांचे परिणाम मनुष्याच्या दानतीवर घडत असतात; व त्यांपैकींच परिस्थिति हेंही