पान:विवेकानंद.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१२०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


ळून आलें, आणि त्या सादृश्यावरून तो प्राणी 'मनुष्य' आहे असे आपण जाणलें. ज्या ज्या वेळीं बाह्यपदार्थाचें सादृश्य आपल्या अंतरंगांत आपणांस सांपडतें, त्या त्या वेळीं तो पदार्थ अमुक असें ज्ञान आपणांस चट्कन होऊन आपलें समाधान तावडतोव होतें. वाह्यप्रतिमांचें साध्य आपल्या अंतःकर--गांत सांपडणें या स्थितीला ज्ञान होणें असें आपण ह्मणतों. अनंत-कालापासून अनंत संस्कार आणि अनंत प्रतिमा आपण आपल्या चित्तांत सांठवीत आलो आहों. चालू काळी कोणतीही प्रतिमा आपणांसमोर आली. ह्मणजे तिचें सादृश्य आपण आपल्या चित्तांत शोधूं लागतों; व तें सांपडलें ह्मणजे त्या बाह्यप्रतिमेचें ज्ञान आपणांस झालें असें आपण ह्मणतों. ज्ञान होणें याचा खरा अर्थ, बाह्यवस्तूचें साध्दय आपल्या चित्तांत शोधून काढणें इतकाच आहे. 'ज्ञान मिळविण्याची खटपट ' या शब्दांचा शास्त्रीय अर्थ झटला ह्मणजे 'स्वतःच्या चित्तांतील वस्तु शोधून काढणें' हाच आहे. कांहीं युरोपीय पंडितांचें मत असे आहे कीं, मनुष्य जन्माला येतो तेव्हां त्याचें मन अगदीं कोरें असतें; पण हें ह्मणणे बरोबर नाहीं; कारण, जर मनुष्याचें मन अगदीं कोरें असेल, तर त्याला कोणत्याही वस्तूचें ज्ञान होणें शक्य नाहीं.ज्ञान याचा अर्थ बाह्यवस्तूचें सादृश्य चित्तांतील भांडारांत शोधून काढणें असा आहे. ज्ञान बाहेरून कोठून येणारी वस्तु नाहीं. त्या अर्थी अगदी कोऱ्या मनाच्या मनुष्याला जगांतील कोणत्याच वस्तूचें ज्ञान होणें संभवत नाहीं- सादृश्य पाहण्याकरितां त्याच्या चित्तांत अनेक वस्तूंचा निधि अगोदरच असला पाहिजे. एखादें मूल अगदी कोन्या मनानें जन्माला आलें अशी कल्पना केली, तर त्याला या जगांतील एकाही वस्तूचें ज्ञान करून घेणे अशक्य होईल. ज्ञान ही कांहीं हप्त्याहत्यांनीं प्राप्त करून घेण्याची चीज आहे असेंही नाही. याकरितां त्याच्याजवळ अनेक वस्तुसंग्रह अगोदरच सिद्ध असला पाहिजे हैं सिद्ध होतें. ज्याप्रमाणें सृष्टि अनाद्यनंत आहे, त्याचप्रमाणें ज्ञानही अनाद्य- नंत आहे. मनुष्याच्या जन्माबरोबर ज्ञान मिळविण्याचा आरंभ होतो असें नाहीं. हा सिद्धांत कबूल करण्यावांचून गत्यंतरच नाही. या सिद्धांतांत कोठेही. पळवाट राहत नाहीं. ज्याप्रमाणें गणितशास्त्राचे सिद्धांत त्रिकालाबाधित अस तात, व ज्याप्रमाणे ते कबूल केल्यावांचून गत्यंतर उरतच नाहीं त्याचप्रमाणे हा सिद्धांतही कालस्थलातीत आहे. स्पेन्सर आणि दुसरे कांहीं पाश्चात्य