पान:विवेकानंद.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


महत्तत्त्वांशापासून अहंकार उत्पन्न झाला असून, तो ज्या अनेक प्रकारच्या घडामोडी करतो त्यांपासून हे आपले शरीर निर्माण झाले आहे. विचाराक्षमबुद्धि ( Sub-consciousness ), विचारवतीबुद्धि ( Consciousness) आणि विचारातीतबुद्धि ( Super-consciousness ), हीं जी बुद्धीचीं त्रिविधरूपें आपल्या प्रत्ययास येतात, त्यांचा अंतर्भाव, या महत्तत्वांशाच्या पोटींच झाला आहे. ही तिन्ही रूपें महत्तत्त्वांतून निर्माण झाली आहेत. आतां या तीन प्रकारांचे वास्तविक स्वरूप काय आहे याचा विचार करूं. विचाराक्षमबुद्धि पशुवर्गात आढळून येते. तिला आपण उपजतबुद्धि असे म्हणतों. पशूच्या सर्व क्रिया उपजतबुद्धीने होत असतात. पशूच्या सर्व क्रिया ठराविकपणे होत असतात असे आपण पाहतो. विचाराक्षमबुद्धि बहुधा कधी चुकत नाही. स्वतःच्या संरक्षणासाठी युक्त काय आणि अयुक्त काय याचे ज्ञान पशूला उपजतबुद्धीने होते; आणि हे ज्ञान चुकीचे असते असे बहुधा कधीच आढळून येत नाहीं. पशु अरण्यांत चरत असला तरी, त्याला विषारी वनस्पति कोणती आणि खाण्यासारखी कोणती याचे ज्ञान उपजतबुद्धीने होते. याप्रमाणे उपजतबुद्धि फारशा चुका करीत नसली, तरी तिचे क्षेत्र अत्यंत मर्यादित आहे हेही विसरता कामा नये. ती ठराविक मर्यादेचे उल्लंघन करूं शकत नाही, यामुळे पशूचे व्यवहारही अत्यंत मर्यादित असतात; ह्मणजे त्याची सारी हालचाल निर्जीव यंत्राप्रमाणे चालते असे म्हणावयास हरकत नाहीं. यानंतरच्या स्थितीत ज्ञानाची अधिक उच्च दशा आढळून येते. या दशेतील बुद्धि अधिक उच्च दर्जाची असते ही गोष्ट खरी; तथापि तिच्या हातून चुकाही अधिक होतात हे लक्ष्यात ठेवले पाहिजे. तिचे क्षेत्र अधिक विस्तृत असते, आणि तिच्या कार्यक्षमतेच्या वाढीचे प्रमाणही अल्प असते. हिला आपण विवेचकर्बुद्धि ( Reason ) या नावाने ओळखतो. विचाराक्षमबुद्धीचे-उपजतबुद्धीचे क्षेत्र मर्यादित पण तिचे कार्य अचुक असते; आणि विवेचकबुद्धीचे क्षेत्र विस्तृत पण तिच्या हातून चुकाही अधिक होतात. बुद्धीच्या या दोन प्रकारांहून निराळा असा आणखी तिसराही एक प्रकार आहे. हा प्रकार फक्त योग्यांच्या ठिकाणी आढळून येतो. हिला आपण विचारातीतबुद्धि (Super-consciousness)असे नांव देऊ. बुद्धीची ही स्थिति अभ्यासाने योगी आपल्या ठिकाणी आणतात. उपजतबुद्धि ज्याप्रमाणे कधीं चुका करीत