पान:विवेकानंद.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन-प्रकरण २ रें.

११७


तही सांपडतो. 'सिद्धानां कपिलो मुनिः' असा उल्लेख करून भगवान् श्रीकृ-ष्णांनीं त्यांना परमेश्वरत्वाची पदवी अर्पण केली आहे ! त्यांच्या या तीव्र ज्ञान-दृष्टीचें कौतुक जेवढें करावें तेवढे थोडेंच.योगाभ्यासानें अतींद्रियज्ञानाची प्राप्ति होते असें योग्यांचे म्हणणे आहे. हे त्यांचें म्हणणें खरें आहे हें सिद्ध करण्यास श्रींकपिलांसारख्या विभूती पुराव्यादाखलच आहेत असें म्हणण्यास हरकत नाहीं. श्रीकपिलांच्या वेळीं दुर्बिणी नव्हत्या अथवा सूक्ष्मदर्शक यंत्रेही नव्हतीं; असें असतांही, त्यांनी सूक्ष्मतम पदार्थांचे शोध कसे लावले ही मोठी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. त्यांची पृथक्करणपद्धति किती निर्दोष आणि परिपूर्ण होती हैं पाहिले म्हणजे, त्यांना अंतींद्रियदृष्टि प्राप्त झाली होती असेंच म्हटले पाहिजे ! असो.
आतां पिंडरचनेकडे पुन्हा वळूं. ज्या पद्धतीनें ब्रह्मांडरचना झाली आहे, त्याच पद्धतीनें पिंडरंचना झाली आहे, याबद्दल आपण विचार केलाच आहे. त्याच्या ठिकाणींही प्रकृति प्रथम अव्यक्त- समतोल असते. त्यानंतर या साम्यावस्थेत बिघाड होतो व प्रकृति व्यक्त होऊं लागते. प्रकृतीचें पहिलें स्वरूप महत् हेच आहे. पिंडांतील हें महत् म्हणजे ब्रह्मांडांतील महत्तत्त्वा-चाच एक स्फुलिंग आहे. स्फुलिंगासारख्या या महत्तत्त्वांतून अहंकार निर्माण होतो. अहंकाराच्या एका भागांतून आज्ञावाहक व स्पर्शवाहक असे दोन प्रकारचे ज्ञानतंतू निर्माण होतात; आणि दुसऱ्यांतून जीं तन्मात्रें निर्माण होतात त्यांपासून जडशरीर बनतें. सुप्रसिद्ध जर्मन पंडित शोपेनहॉर याचें मत व वेदांतमत यांत जो एक फरक आहे तो येथें सांगणे इष्ट आहे. शोपेन-हॉरच्या मतें, 'इच्छा' ( Desire or will ) हेंच विश्वाचें आदिकारण आहे. 'जगावें' अशी इच्छा आपल्या हृदयांत जागृत असते तीमुळेच आपण व्यक्तत्वास येतों असें शोपेनहॉरचें मत आहे. अद्वैतसिद्धांताला हे मत मान्य नाहीं. त्यांच्यामतें महत् हेंच विश्वाचें कारण आहे. इच्छा हें स्वतंत्र रूप नाहीं, तें केवळ परावर्तित रूप आहे. अहंकारांतून इच्छा उद्भवते. तिचें अस्तित्व अहंकारावर अवलंबून आहे; आणि अहंकार हा स्वतःहून अधिक मोठया. रूपांतून निर्माण झाला आहे. हे मोठे रूप म्हणजे महत्तत्त्व हेंच होय. अव्यक्त प्रकृतीचें पहिलें व्यक्त रूप महत् हैं आहे.
 महत्तत्त्वाचा जो सूक्ष्म अंश पिंडांत- मानवदेहांत - प्रकट झाला त्याचें स्वरूप यथास्थित रीतीनें समजावून घेणें फार महत्त्वाचे आहे. पिंडांतील