पान:विवेकानंद.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय


त्यावेळी प्रकृतीचा अंशच अव्यक्तदशेत असतो. या मानवी प्रकृतींतून मानवी मह्त् म्हणजे बुद्धि प्रथम व्यक्त होते. ही बुद्धि म्हणजे महत्तत्त्वाचा अथवा विश्वव्यापी बुद्धीचा अंशच आहे. या मानवी बुद्धींतून मानवी अहंकार निर्माण होतो. या अहंकारांतून त्या व्यक्तीच्या ठिकाणी दिसून येणारी इंद्रियें आणि तन्मात्रा असे दोन प्रकार निर्माण होतात. तन्मात्रांपासून स्थूल देह बनतो. आपण ही सारी रचना विशेषेकरून लक्ष्यांत ठेवावी अशी सूचना आगाऊ देऊन ठेवणे इष्ट आहे; कारण, वेदांताच्या पुढील भव्य इमारतीचा हा पाया आहे. दुसरे असे की, जगांत जितकीं दर्शनें आज अस्तित्वांत आहेत त्या सर्व दर्श- नांचासुद्धां हाच पाया आहे. याकरितां सांख्यांची विश्वरचनेची मीमांसा आपण उत्तम रीतीनें समजून घ्यावी व नीट ध्यानांत ठेवावी अशी सूचना मी मुद्दाम दिली आहे. कोणत्याना कोणत्या रीतीनें सांख्यदर्शनाचा आधार या जगांतील प्रत्येक तत्त्ववेत्त्यानें घेतला आहे. श्रीकपिलांचें थोडें अथवा फार ऋण ज्यानें घेतलें नाहीं असा एकही पंडित या पृथ्वीतलावर आपणांस सांपडणार नाहीं. पायथागोरास या नांवाचा एक प्रवासी हिंदुस्थानांत आला व त्यानें सांख्यमताचा अभ्यास करून तें दर्शन ग्रीक लोकांस दिलें. कांही काळानें तें अलेक्झांड्रिया- कडे गेलें आणि त्यानंतर कांहीं काळानें त्याच्याच पायावर एक नवा पंथही उपस्थित झाला. या पंथाच्या मतांत ख्रिस्ती व हिंदु या तत्त्वज्ञानांचें मिश्रण सांपडतें. या पंथाला Gnostic असें नांव आहे. अशा रीतीनें या दर्शनाच्या ज्या दोन शाखा झाल्या, त्यांपैकीं एक युरोप व अलेक्झांड्रियाकडे गेली व दुसरी हिंदुस्थानांत राहिली. जी शाखा हिंदुस्थानांत राहिली तिच्या पायावर दुसरी अनेक दर्शनें तेथे जन्माला आली व श्रीव्यासांचें दर्शन हैं त्यांपैकींच एक आहे. शुद्ध विवेचकबुद्धीने दाखविलेल्या मार्गावर आरूढ होऊन विश्वाच्या कोड्यांचा ज्यांत समाधानकारक रीतीनें उलगडा केला आहे असे हे पहिले दर्शन होय. श्रीकपिल यांची योग्यता आद्य दर्शनकार या नात्यानें फारच मोठी आहे यांत संशय नाहीं. जगांतील कोणीही तत्त्वदर्शी असो, त्यानें या आद्य गुरूंच्या चरणीं मस्तक वाहावें हें त्यास योग्य आहे. तत्त्वज्ञानाच्या या आद्य प्रणेत्याचें म्हणणें ऐकून घेऊन त्याला योग्य मानाचें स्थान देणे आपले कर्तव्य आहे, हैं आपण अवश्य ध्यानांत ठेवले पाहिजे. जगांतील तत्त्वज्ञांच्या पंक्तींत मेरु- मण्याच्या जागीं विराजमान् होणाऱ्या या नरश्रेष्ठाच्या नांवाचा उल्लेख श्रुतीं-