पान:विवेकानंद.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन - प्रकरण २ रें.

१११


आहेत त्यांवरून त्या शास्त्रांचा कलही हळुहळू हाच सिद्धांत सांगण्याकडे होत आहेसें दिसतें. आपल्या अर्वाचीन शास्त्रांनी अगदी शेवटचा म्हणून शोधून काढ- लेला पदार्थ Ether ( आकाश ) हा होय. या ईथरचें स्वरूप काय आहे ? तोही अनेक परमाणूंचा बनला आहे असें म्हटले तर, परमाणूंपासून विश्व बनलें आहे, हा तुमचा सिद्धांत सिद्ध होत नाहीं. आपली हवा ही परमाणूंपासून बनली आहे असे समजूं; हे परमाणू कोठें राहतात याचा विचार केला असतां ते ईथरमध्येंच तरंगत असतात असे म्हटले पाहिजे, कारण, ईथर हा सर्व- व्यापी, सर्वोतरात्मा आणि सर्वसाक्षी असा आहे. याकरितां हवेचे परमाणू- सुद्धां ईथरमध्येच तरंगत असले पाहिजेत हैं उघडे आहे. आतां. अशा स्वरू- पाचा ईथरसुद्धां जर परमाणूंचा बनला आहे असे मानले, तर त्याच्या दोन परमाणूंमध्यें पोकळी शिल्लक असलीच पाहिजे. ही पोकळी कशानें भरली आहे ? ही पोकळी दुसन्या कसल्यातरी परमाणूंनी भरली आहे असे मानलें, तर त्या दुसऱ्या दोन परमाणूंतही ही पोकळी शिल्लक राहीलच. ती कशानें भरली अर्से म्हणावयाचें ? त्यासाठीं विरलतर स्वरूपाचा ईथर अस्तित्वांत आहे असें मानलें, तरी पूर्वीची प्रश्नपरंपरा शिल्लक उरतेच.. अशा रीतीनें विचार करतां करतां परमाणूंचा शेवट असा केव्हांच होत नाहीं. अशा प्रकारच्या वादपद्धतीला अनवस्था असें नांव सांख्यांनी दिले आहे. सिद्धांत अंतिम स्वरूपापर्यंत न पोहोंचणें याला अनवस्था असे म्हणतात. या विवेचनावरून परमाणु हें विश्वरचनेचें आदिकारण आहे हा सिद्धांत सिद्ध होऊं शकत नाहीं हैं आपल्या लक्ष्यांत आलेच असेल.
 प्रकृति ही चिरकालवासी असून, तें अनेक जडवस्तूच समवायीरूप आहे; आणि विश्वांत जितक्या वस्तू प्रतीत होतात तितक्या साऱ्यांची कारणें, प्रकृ- तींत अंतर्भूत झाली आहेत. आतां कारण या शब्दाचा अर्थ काय याचा विचार करणें अवश्य आहे. प्रत्यक्ष अथवा दृश्यस्थितीचें जें विरल अथवा सूक्ष्मरूप, तें त्या दृश्यस्थितीचें कारण असे आपण म्हणतों. कारण आणि कार्य यांत जो फरक असतो तो फक्त, स्वरूपाचाच असतो. आतां नाश या शब्दाचा नाश या शब्दाचा शास्त्रीय अर्थ म्हणजे कारणरूपाला परत जाणें असा आहे. ज्या मूलद्रव्यांचे घटक एकत्र मिळून एखादा पदार्थ बनला असेल, तीं द्रव्ये आपल्या मूळच्या स्थितींत परत गेलीं, म्हणजे त्या दृश्य पदार्थांचा अर्थ काय