पान:विवेकानंद.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
११०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

प्रकरण २ रें.


प्रकृति आणि पुरुष.


 विश्वरचनेंत ज्या पदार्थांचा अंतर्भाव होतो त्यांचा व्यष्टिशः विचार आप- णांस करावयाचा आहे. विश्वाचें कारण प्रकृति आहे हें पूर्वी सांगितल्याचें आपणांस आठवत असेलच. याकरितां प्रकृतीचें स्वरूप काय आहे याजबद्दल प्रथम विचार करणे इष्ट आहे. प्रकृति हें विश्वाचें समवायी रूप आहे असें सांख्यांचें ह्मणणें आहे. सत्त्व, रज आणि तम हे तिन्ही गुण समतोल होऊन विश्व अव्यक्तदशेंत गेलें म्हणजे विश्वाच्या त्या स्वरूपाला प्रकृति अर्से नांव प्राप्त होते. त्या स्थितीत प्रकृतींतील सर्व तत्त्वें समतोल स्थितीत असतात. पूर्ण समतोल अवस्थेत कोणतीही गति असत नाहीं हें उघडच आहे. यत्किं- चितूही गति अथवा हालचाल नसणे हीच समतोलपणाची खूण आहे; तेथें गति अथवा हालचाल उत्पन्न झाली ह्मणजे विश्व प्रतीत होऊं लागतें. आपण जें जें कांहीं पाहतों, ज्याला ज्याला आपण स्पर्श करूं शकतों अथवा ज्याचें ज्ञान आपणांस आपल्या कर्मेंद्रियद्वारा होतें, तो प्रत्येक पदार्थ जडवस्तु आणि गति यांचे मिश्रण आहे. ज्या वेळीं प्रकृति आपल्या मूलरूपांत ह्मणजे अव्यक्त- स्थितींत असते, त्यावेळी तेथें पूर्ण समतोलपणा आणि निष्पंदावस्था अस ल्यामुळे ती अविनाशी असते. आपण प्राकृत लोक ' नाश' हा शब्द ज्या क्रियेला लावतों तिचें शास्त्रीय स्वरूप 'विघटना' हेंच होय. एखाद्या पदार्था- तील घटकांची विघटना झाली ह्मणजे तो पदार्थ नाश पावला असे आपण ह्मणतों. कोणत्याही पदार्थाला मर्यादा असल्यावांचून त्याचा नाश होऊं शकत नाहीं. अमर्याद पदार्थात विघटना होणें शक्य नाहीं, असा सांख्यांचा सिद्धांत.आहे. त्याचप्रमाणे 'अणु ' हे पदार्थाचें मूलरूप नव्हे; असेंही सांख्यांचें मत आहे. दृश्यावस्थेतील प्रत्येक पदार्थ परमाणूंपासूनच निर्माण झाला आहे हें खरें, पण परमाणु हें शेवटचें अथवा मूलरूप नव्हे. केवळ परमाणूंतूनच विश्व निर्माण झालेलें नाहीं. परमाणु हें स्वरूप मूलरूपापासून दुसऱ्या अगर तिसऱ्या पायरीचें स्वरूप आहे. मूलरूपांत मिश्रण होऊन त्यापासून परमाणू बनतात आणि परमाणूंचें पुनर्मिश्रण होऊन त्यांतून विश्वांतील अनेक पदार्थ निर्माण होतात. आपल्या अर्वाचीन शास्त्रांनी जे कांहीं सिद्धांत स्थापित केले