पान:विवेकानंद.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन-प्रकरण १ लें.

१०९.


सांख्यमताने याप्रमाणे दिले आहे. यावरून असे सिद्ध होते की, हे विश्व अस्तित्वात आल्यापासून महत्तत्त्व म्हणजे विश्वव्यापी मनही अस्तित्वांत आहे. त्याला अस्तित्व नाही असा एक क्षणही नव्हता. प्रत्येक मानवी प्राण्याला आणि प्रत्येक सजीव प्राण्यालाही या विश्वव्यापी मनाचा अंश मिळालेला आहे, आणि ते महत्तत्त्व सदोदित राहणारे असल्यामुळे तो अंश त्याला सदोदित मिळत राहतो.