पान:विवेकानंद.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

२

स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

कांडाचाच अंतर्भाव होतो असे पाश्चात्त्य पंडित समजतात; पण आर्यावर्तीत सध्या कर्मकांड बहुतांशी प्रचारांतून गेले असून श्रुति ह्मणजे वेदान्त असाच अर्थ तेथे रूढ झाला आहे. एखाद्या दर्शनकाराला अथवा टीकाकाराला आपल्या मताच्या पुष्टीकरणासाठी श्रुतीचा आधार द्यावयाचा असेल तर तो नेहमी ज्ञानकांडाकडेच धांव घेतो. वेदान्त या शब्दाने ज्या उपनिषदांचा बोध होतो ती सर्वच संहितेनंतर लिहिली गेली असें नाहीं. उदाहरणार्थ, ईश नांवाचे जें उपनिषद आहे ते यजुर्वेद संहितेपैकीच आहे. दुसरी कित्येक उपनिषदें ब्राह्मण ग्रंथांतून आढळतात. याशिवाय कित्येक अगदीं स्वतंत्रपणेही लिहिलेली आहेत. तथापि ते सुद्धा आरंभापासूनच स्वतंत्र ग्रंथ असतीलच असे ह्मणवत नाही. कारण कित्येक ब्राह्मण ग्रंथ कालाच्या उदरांत नष्ट झाले असल्याचे आढळून आले आहे. कदाचित त्यांपैकी उपनिषद्भाग मात्र शिल्लक राहून बाकीचा भाग नष्ट झाला असण्याचा संभव आहे. उपनिषदांस आरग्यकें असेंहि दुसरें नांव आहे.

 यावरून अनेक धर्मग्रंथांस समुच्चयेंकरून वेदान्त असे नांव आयनी दिले आहे असे आपणांस आढळून येईल. पूर्वपरंपरेस अनुसरून ज्यास आपल्या विशिष्ट मताचे प्रतिपादन करावयाचे असेल अशा प्रत्येक आचार्यास स्वमताच्या पुष्टीकरणार्थ या वेदान्तग्रंथांकडे धांव घ्यावी लागते. वास्तविक पाहतां बौद्ध अथवा जैन हे अगदी स्वतंत्र धर्म असतां त्यांचे आचार्यहि स्वतःस सोइस्कर वाटेल त्यावेळी स्वमतपुष्टीसाठीं वेदान्तग्रंथांचे आधार घेतात. यावरून वेदान्तग्रंथांचे महत्व आर्यावर्तीत किती मोठे समजले जाते याचे आपणांस अनुमान होते.

 हिंदुस्थानांत सांप्रत अनेक मते प्रचलित आहेत व या सर्वांची रचना जरी वेदान्तग्रंथांच्या आधाराने झाली आहे तरी त्या सर्वांनी स्वमतदर्शक अशी निरनिराळी विशिष्ट नांवें धारण केली आहेत. व्यासमत हैं यांपैकीच एक असून भगवान् व्यासांनी स्वमतपुष्टीसाठी वेदान्तग्रंथांचा जितका आधार घेतला आहे तितका दुस-या कोणीहि तो घेतलेला नाही. त्याचप्रमाणे सांख्यन्यायादि मते व वेदान्त यांची एकवाक्यता करण्याचा यत्नही श्री व्यासांच्या पूर्वी कोणी केला नव्हता. भगवान् व्यासांनी जी वेदांतसूत्रे रचिलीं आहेत यांच्या आधारानेच त्यानंतरचे सर्व वेदान्तग्रंथ लिहिले गेले आहेत. खुद्द या