पान:विवेकानंद.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वामी विवेकानंद याचे सम्यग्रंथ
तृतीय खंड.
वेदांतमताचें सामान्य निरीक्षण,
[ हार्वर्ड युनिव्हर्सिटीच्या तत्त्वसंशोधक मंडळापुढे ता. २५ मार्च १८९६ रोजी दिलेले व्याख्यान.']


 वेदान्त ह्मणजे अद्वैत सिद्धांत अशी समजूत सध्या सर्वत्र झाली आहे; पण वेदान्त या शब्दाने केवळ अद्वैत सिद्धांताचाच बोध होत नसून त्याच्या पोटीं आर्यावर्तातील प्रचलित असलेल्या सर्व मतांचा आणि मतांतरांचा अंतर्भाव होतो. सध्याच्या कालींही हिंदुस्थानांत. अनेक मते आणि अनेक पंथ प्रचारांत आहेत. यांपैकी द्वैतसिद्धांत ही अगदी खालची पायरी असून अद्वैत ही अगदी शेवटची पायरी आहे. तत्त्वदर्शनांची जी भव्य इमारत आर्यांनी उभारली आहे. तिचा तळमजला द्वैत हा असून अद्वैतसिद्धांत हा कळस आहे असे ह्मणावयास हरकत नाहीं.
  वेदान्त या शब्दाचा पदशः अर्थ वेदांचा शेवट असा आहे. वेद हे आयचे धर्मग्रंथ असून त्यांत कर्मकांड व ज्ञानकांड असे दोन भाग आहेत. यांपैकी कर्मकांडांत यज्ञयागादि आचार सांगितले असून ज्ञानकांडांत तत्त्वज्ञानाचे उद्घाटन केले आहे. ज्ञानकांडांत उपनिषदांचा अंतर्भाव होतो; तथापि सर्व उपनिषदें कर्मकांडानंतर लिहिली गेली नसून कर्मकांडांतही कित्येक उपनि घद्भाग आढळतात. भगवद्गीता हा अगदीं स्वतंत्र ग्रंथ असतांही त्याचा अंतभव उपनिषदांत करण्याचा परिपाठ पडला आहे. ही सर्व उपनिषदे व गाता यस सामग्र्येकरून वेदान्त अशी संज्ञा आहे. श्रुति' या संज्ञेत केवळ कर्म-