पान:विवेकानंद.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०८
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय


नाहीं. त्या पदार्थाच्या स्वतःच्या रूपाची ओळख मला कधीं होतच नाहीं. त्याचें रूप व नांव दें मी त्याला माझ्या मनाच्या इच्छेप्रमाणे दिलेलें असतें. एखाद्या शांत तळ्यांत आपण धोंडा टाकला असतां त्याच्या पृष्ठभागावर येणाऱ्या लाटा आपणांस दिसतात. तसेच आपल्या चित्तांत बाहेरील एखादा पदार्थ जाऊन आदळला म्हणजे त्याजवर लाटा उठतात; व त्या जशा आका- •राच्या असतील तसा आकार आपणांस समोर दिसूं लागतो. अशाच रीतीनें या समोरील भिंतीकडे मीं पाहिले, तर माझ्या चित्तांत जो कांहीं आकार असेल तोच मला दिसेल. वस्तुतः बाह्यपदार्थाचें स्वरूप काय आहे हे मला ठाऊक नाहीं. हें समजणे शक्यच नाहीं. त्याचें ज्ञान मला व्हावें अशी इच्छा माझ्या मनांत उद्भवल्याबरोबर माझा अहंकार जागृत होतो व त्या वस्तूला लागणारी सर्व सामुग्री तो निर्माण करतो. त्या सामुग्रीतून मी तो पदार्थ निर्माण करतों · आणि 'मीं अमुक पाहिलें' असे म्हणतों. माझ्या डोळ्यांवर पडलेल्या • प्रतिबिंबाला लागणारी सर्व सामुग्री मी माझ्या मनांतूनच निर्माण करून दिलेली असते. आतां येथें बाह्यपदार्थाचे काम तरी काय आणि तो स्वतः कोणती क्रिया करतो असा प्रश्न उद्भवतो. त्याचें उत्तर असें कीं, बाह्यपदार्थ हा माझ्या अंतरिंद्रियांना चालन देण्याचें एक साधन मात्र होतो. धोंडा तळ्यांत पडला म्हणजे जशा त्याजवर लाटा उठतात, त्याचप्रमाणे बाह्यपदार्थ हा माझ्या चित्तावर लाटा उठविण्याचें मात्र कार्य करतो. त्या लाटा उत्पन्न झाल्या म्हणजे - माझें मन त्यांकडे पाहू लागतें, व त्या क्षणीं तें जो आकार धारण करतें तो मला दिसतो. याचा अर्थ असा की, मी स्वतःच जो आकार निर्माण करतों तो मी पाहत असतो. आतां येथे आणखीही एक प्रश्न उद्भवतो तो असा कीं, जर हे सारे आकार आपणच आपल्या मनानें बनविले आहेत, तर त्यांत साम्य कसे उत्पन्न होतें ? आपण सर्व व्यक्ति निरनिराळ्या आहों, त्याअर्थी आपले सर्व आकारही निरनिराळे कां होऊं नयेत ? 'झाड' असा शब्द उच्चा- .रल्याबरोबर आपणा सर्वोच्या मनांत, एकाच विशिष्ट आकाराची उत्पत्ति कशी होते ? याचें कारण असे कीं, आपण सारे विश्वरूप मनाचेच अंश आहों. आपणांपैकी प्रत्येकामध्ये एकाच महत्तत्त्वाचा अंश आहे. ज्याला मन म्हणून इंद्रियाची प्राप्ति झाली असेल त्याला ती वस्तु तशीच दिसेल; आणि ज्याला मनाची प्राप्ति झाली नसेल त्याला ती दिसणार नाहीं. आपल्या प्रश्नाचें उत्तर