पान:विवेकानंद.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन - प्रकरण १ लें.

१०३

फेंकला, तर ताबडतोब त्या ठिकाणीं क्रिया आणि प्रतिक्रिया निर्माण होऊन पृष्ठभागाचा क्षोभ होतो, आणि त्यावर तरंग अथवा स्पंद उद्भवूं लागतात. धोंडा आंत पडल्याबरोबर पाण्याचे कांहीं बिंदू एकदम विभक्त होतात; पण कांहीं क्षण गेले न गेले तोंच ते एकत्र होऊन, धोंड्याच्या क्रियेला प्रतिक्रिया करूं लागतात. धोंड्यामुळे पाण्यावर ज्याप्रमाणें तरंग उद्भवतात, त्याचप्रमाणें बाह्य वस्तूच्या आघातानें चित्तावर तरंग उद्भवतात. या तरंगरूप चित्ताला मन अशी संज्ञा आहे. यानंतर चित्त प्रतिक्रिया करूं लागतें; ह्मणजे स्थिरावूं लागते. या प्रतिक्रियेच्या रूपाला बुद्धि अशी संज्ञा आहे. बुद्धीच्याही पाठी- मागें आणखी एक अधिष्ठान आहे; हें अधिष्ठान चित्ताच्या सर्व क्रियांना 'व्यापून असतें; या अधिष्ठानाला अहंकार अशी संज्ञा आहे. स्वतःची जाणीव असणें हें अहंकाराचें स्वरूप आहे. 'मी आहे' असे आपणांस प्रत्येक क्षणीं वाटत असतें; ही जाणीव राहणे हेच अहंकाराचें स्वरूप. या अहंकाराच्या पाठीमागें महत् नांवाचें तत्त्व आहे, यालाच बुद्धि असेंही नांव केव्हांकेव्हां देतात. अव्यक्त प्रकृति व्यक्तत्वास आली तेव्हां तिनें जें अगदीं पहिलें रूप धारण केलें, तें महत् हेंच होय. प्रकृतीचीं जितकीं स्वरूप आपणांस आढळ- तात, त्या सर्वांत महत् हें स्वरूप श्रेष्ठतम आहे. या महत्तत्त्वाच्यामागें पुरुष असून त्यालाच आत्मा असेंही नांव आहे. पुरुष अथवा आत्मा हा सदैव शुद्ध आणि पूर्ण असा असून, सर्वांचा द्रष्टा तोच आहे, व ही सारी प्रकृति त्याच्या करितांच नटली आहे. पुरुष स्वतः केवळ साक्षिरूप असून, तो प्रकृतीचे हे अनेक व्यक्त प्रकार अवलोकन करीत असतो. पुरुष स्वतः कोणत्याही कार- णानें अशुद्ध होत नाहीं; परंतु अभ्यासामुळे तो अशुद्ध आहेसा भासतो. अध्यास ह्मणजे परावर्तन. ज्याप्रमाणे शुभ्र रंगाच्या स्फटिकासमोर तांबड्या रंगाचें फूल धरलें असतां तो स्फटिक जसा तांबडा आहेसा भासतो, त्याचप्रमाणे प्रकृतीच्या प्रतिबिंबामुळें पुरुष अनेक प्रकारचा आहे असा भास होतो. तांबड्या अथवा निळ्या फुलामुळे ज्याप्रमाणे शुभ्र स्फटिकाच्या रंगांत वस्तुतः फरक होत नाहीं, अथवा त्या फुलाच्या रंगाचा लेप त्याला होत नाहीं, त्याचप्रमाणें, प्रकृतीच्या वारंवार बदलणाऱ्या स्वरूपामुळे पुरुषही बदलत नाहीं. पुरुष अनेक आहेत असें सांख्य मत आहे. हे सर्व पुरुष वस्तुतः अत्यंत शुद्ध आणि पूर्ण असून जडपदार्थाच्या संयोगामुळें ते अशुद्ध भासतात. प्रकृतीचे जे हे अनंत प्रकारचे खेळ सुरू आहेत