पान:विवेकानंद.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१०२
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

 आतां प्रत्येक प्रकारच्या क्रियेकरितां निरनिराळ्या इंद्रियांची योजना कां केली आहे याचा विचार करूं. डोळे, कान, नाक इत्यादि अवयवांकरितां निर निराळी इंद्रियें कां असावी ? जर सर्वांचें मिळून एकच इंद्रिय असतें तर का बिघडलें असतें ? या प्रश्नाचा विचार थोड्याशा विस्ताराने केला पाहिजे. मी आपणांशी भाषण करीत आहें; आणि आपण तें ऐकत आहां. यावेळी आजू- बाजूला काय चालले आहे याचें ज्ञान तुझांस होत नाहीं; कारण, तुमचें मन सध्या कर्णेद्रियाशीं संलग्न असल्यामुळे, इतर इंद्रियांपासून सध्या तें विभक्त झालें आहे. जर निरनिराळ्या क्रिया करणारें इंद्रिय एकच असतें, तर पाहणें, ऐकणें, वास घेणे इत्यादि अनेक क्रिया आपणांस एकाचवेळीं करतां आल्या असत्या; इतकेच नव्हे, तर या क्रिया एकमेकांपासून भिन्नपणें करणें आपणांस अशक्यच झालें असतें. याकरितां प्रत्येक क्रियेला वेगळें इंद्रिय असावें हें अत्यंत जरुरीचें आहे. या गोष्टी अर्वाचीन इंद्रियविज्ञानशास्त्रानें प्रत्यक्ष सिद्ध केल्या आहेत. आपणांस एकाच वेळीं, पाहण्याची व वोलण्याची अशा दोन क्रिया करतां येतात ही गोष्ट खरी; पण त्याचें कारण त्या दोन क्रियांचें इंद्रिय एक आहे हें नसून, आपलें मन एकाच वेळीं त्या दोन इंद्रियांशी संलग्न राहूं शकतें, हे आहे. आ पले बाह्य अवयव हे केवळ जडपदार्थाचे बनलेले आहेत. कान, डोळे, नाक इत्यादि आपले अवयव पहा; हे सर्व जड अणूंपासून निर्माण झाले आहेत, आणि आपली इंद्रियें, ही त्याहून सूक्ष्म अणूंपासून बनलेलीं आहेत. त्यांचें स्थान देहाच्या आंत असून, बाह्य अवयवांचें चालकत्व या इंद्रियांकडे अथवा गोल- कांकडे आहे. आपलें हें सारें शरीर जड अथवा स्थूल अणूंपासून बनलेले असून, त्यांत प्राणशक्तीच्या स्थूल अथवा दृश्यरूपाचा प्रत्यय येतो; आणि अंतरिं-- द्रियें हीं सूक्ष्म अणूंपासून बनली असून, त्यांतून वावरणारी प्राणशक्ति, ही सूक्ष्म स्वरूपाची असते. हीं सर्व इंद्रियें आणि अंतःकरण मिळून, प्रत्येक मनु- घ्याचा लिंग अथवा सूक्ष्मदेह बनलेला असतो.
 या सूक्ष्मदेहालाही आकार आहे. कारण, प्रत्येक जड पदार्थाला आकार 'असलाच पाहिजे असा नियम आहे. हा देह आपणांस न दिसण्याइतका सूक्ष्म असला, तरी तो ज्या अणूंचा बनला आहे ते जडच आहेत. इंद्रियांच्या पाठीमागें आपलें मन आहे. चित्त, वृत्तिरूप अथवा चंचल झाले ह्मणजे त्यास मन अशी संज्ञा प्राप्त होते. एखाद्या शांत असलेल्या तळ्यांत आपण धोंडा