पान:विवेकानंद.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
१००
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

वाटण्याचा संभव आहे. सर्व सृष्टि भूतांपासून उत्पन्न झाली आहे, असे त्यांचें मत असल्याचें अगोदर सांगितलेच आहे. ज्या भूतांपासून ही सृष्टि निर्माण झाली, तीं भूतें, त्यांहून सूक्ष्मतर अशा पदार्थापासून निर्माण झाली आहेत. भूतें हीं जडस्वभाव आहेत. दृश्यरूपाला आलेला असा प्रत्येक जडपदार्थ, सूक्ष्मरूपाच्या कित्येक अणूंपासून निर्माण झालेला असतो असा नियम आहे. याच नियमाला अनुसरून जड भूतें हींसुद्धां, स्वतःहून अधिक सूक्ष्म अशा अणूंपासून निर्माण झाली असली पाहिजेत हैं उघड आहे. या सूक्ष्मरूपाच्या अणूंस तन्मात्रें असें म्हणतात. आपण एखादें फूल हुंगलें तर आपणास त्याचा वास समजतो. अशा वेळीं, आपल्या नाकाशीं दुसऱ्या कसल्यातरी पदार्थाचा संयोग झाला असला पाहिजे हैं उघड आहे. फूल आफ्णापासून थोडें लांब असले, तरी त्याचा वास आपणांस येतो. तें फूल आपली जागा सोडून आपणाकडे आलेले नसतें तें जागच्याजागींच असतां, त्याचा वास मात्र आपणांस येतो हें कसें ? याचें कारण असे की, त्या फुलांतून वास असलेले असे सूक्ष्म अणू बाहेर पडतात, आणि त्यांचा संयोग आपल्या घ्राणेंद्रियाशीं होतांच त्यांचे अस्तित्व आपल्या लक्ष्यांत येतें.
 या सूक्ष्मरूपाच्या अणूंस तन्मान्नें असें नांव आहे. फुलांतून बाहेर पड णारे हे अणू, इतक्या सूक्ष्म स्वरूपाचे असतात कीं, सारा दिवसभर ते त्यांतून एकसारखे बाहेर पडत राहिले, तरी त्या फुलांत कोणत्याही प्रकारचा उणेपणा उत्पन्न झाल्याचे आपल्या नजरेस येणार नाहीं. याचप्रमाणे उष्णता, तेज इत्यादिकांचीं तन्मात्रें आहेत. तन्मात्रें हीं अणुरूप असून तीं स्वतः परमाणूंपासून बनलीं आहेत. परमाणूंचा आकार किती मोठा असावा, याबद्दल अनेक पंडि- तांच्या अनेक कल्पना आहेत; तथापि त्या केवळ कल्पनाच असून त्यांचें सत्यत्व अद्यापि सिद्ध झाले नसल्यामुळे, त्यांजबद्दल अधिक विचार करण्याचें प्रयोजन आपणांस नाहीं. प्रत्येक जडपदार्थ अत्यंत सूक्ष्म अशा स्वरूपाच्या अणूंपासून बनला आहे, इतकें आपणांस समजलें ह्मणजे पुरे. कोणत्याही पदा- र्थाचें जें कांहीं बाह्यस्वरूप आपणांस दिसतें तें जड स्वरूप असून, जडतत्त्वां पासून निर्माण झाले आहे. यानंतर त्या पदार्थाच्या अंतःस्वरूपाची ओळख आप- णांस आपल्या अंतरिंद्रियांनी होते. ज्या अणूंपासून तो पदार्थ बनला असेल त्या अणूंचा संयोग, आपले नाक, डोळे, कान इत्यादिकांशी झाला, ह्मणजे त्या