पान:विवेकानंद.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन–प्रकरण १ ले.

९९

प्राप्त होतात. प्राण याला इंग्रजीत Life or Vital Energy ( जीव किंवा जिवटपणा ) असें नांव देतां येईल; तथापि मनुष्यांतला जीव तेवढाच कायतो प्राण असें मात्र समजूं नये. मनुष्यांतील जीव अथवा जिवटपणा, हा प्राणशक्तीच्या अनेक प्रकारांपैकी एक प्रकार आहे इतकेंच, तसेंच आत्मा आणि प्राण हेही अगदीं वेगळे आहेत, हें अवश्य लक्ष्यांत ठेवावें. प्राण आणि आकाश यांपासून सर्व विश्व उत्पन्न झाले असून त्याला आरंभ आणि शेवट नाहीं, ही गोष्ट आतां आपल्या लक्ष्यांत पक्केपणीं आली असेल. अमुक वेळीं विश्व प्रथम निर्माण झालें असें नाहीं; अथवा अमुक वेळी ते नष्ट होईल असेंही नाही. त्याला आरंभ असा कधी झालाच नाहीं, आणि त्याचा अंतही कधीं होणार नाहीं. तें अनाद्यनंत आहे.  आतां यापुढे जो एक प्रश्न उपस्थित होतो, त्याचा विचार विशेष सूक्ष्म- बुद्धीनें केला पाहिजे. कांहीं युरोपियन तत्त्ववेत्त्यांचें ह्मणणे असे आहे कीं, जगाचें अस्तित्व द्रष्ट्याच्या अस्तित्वावर अवलंबून आहे. 'मी' आहे ह्मणून जग आहे; जर 'मी' नष्ट झालों तर जगही नष्ट होईल; हे त्यांचें ह्मणणें अ- धिक स्पष्ट करून सांगितलें पाहिजे. जगांतील सर्व मनुष्यें व पशुपक्षी इत्यादि सजीव, सेंद्रिय व ज्यांना जाणीव आहे असे प्राणी जर नष्ट झाले तर जगही अश्य होईल. जगाला पाहणारा-जाणणारा - कोणीतरी आहे ह्मणून जग आहे; आणि जाणणाराच्या अभावीं जगही नष्ट होईल. हे मत समजण्यास थोडेंसें कठीण आहे व यामुळे तें विसंगत वाटतें हें खरें; पण या त्यांच्या ह्मणण्यांत पुष्कळ तथ्य आहे हे आपणांस पुढे हळुहळू कळून येईल; तथापि खुद्द या तत्त्ववेत्त्यांसही या आपल्या मताची उभारणी, सूक्ष्मेद्रियशास्त्राच्या आधारानें करता आली नाहीं. या आपल्या ह्मणण्याला सूक्ष्मेंद्रियशास्त्राचा कांहीं आधार आहे की नाहीं, याचा विचार त्यांनी केलेला दिसत नाहीं. त्यांनी जें तत्त्व प्रतिपादिलें आहे तें केवळ तत्त्वदृष्टीनें बरोबर आहे; पण त्याची सिद्धि सशास्त्र रीतीनें त्यांना करता आली नाहीं. यावरून या तत्त्वाची फक्त पुसट कल्पना मात्र त्यांस आली असावी असे वाटतें.
 या युरोपियन तत्त्ववेत्त्यांच्या म्हणण्याचा विचार करण्यापूर्वी, आमच्या प्राचीन आर्यतत्त्ववेत्त्यांच्या आणखी एका मताचा विचार प्रथम करणे अवश्य आहे. हे त्यांचें मत नवख्या मनुष्याला आरंभी थोडेंसें चमत्कारिक