पान:विवेकानंद.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९६
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[तृतीय

बसत होती त्यावेळी कोणाचे अस्तित्व होते ?" असा प्रश्न करून ऋग्वेदानें त्याचे उत्तर आपणच दिले आहे.

नासदासीन्नोसदासीत्तदानीं नासीद्रजोनोव्योमापुरोयत्।
किमार्वरीवः कुहुकस्य शर्मन्नम्भः किमसीद्गहनंगभीरम् ॥ १ ॥
न मृत्युसीमृतं न तर्हि न राच्या अन्ह आसीत्प्रकेतः ।
आनीदवातं स्व॒धय॒ तदेकं तस्माद्धान्यन्नपूरः किंचनास ॥ २ ॥
तमआसीत्तर्मसागूळ्हमग्ने प्रकृतं संलिलं सर्वमाइदम् ।
तुच्छयेनाभ्वपिहितं यदासीत्तपंसस्तन्महिनाजयुतैर्कम् ॥ ३ ॥
कामुस्तदग्रे समवर्तुताधिमनसो रेत:प्रथुमंयदासीत् ।
सुतोबन्धुमसतिनिर्रविन्दन्हृदिप्रतीष्योकुवयेमनीषा ॥ ४ ॥
तिरश्चीनविर्ततोरश्मिरेषामृधःस्विद्रासी ३दुपरिस्विदासी ३ त् ।
रेतोधाआसन्महिमानआसन्त्स्व॒धाअवस्तात्प्रयति:पुरस्तात् ॥५॥
कोअद्धावेदकइहप्रवे चत्कुतआजाताकुर्तड़यंविसृष्टिः।
अर्वाग्देवाअस्यविसर्जनेनाथको वेदुयतआबभूव ॥ ६ ॥
इयंविसृष्ट्रियतआबभूवुयदिवाद्धेयर्दिवान ।
यो अस्याध्यक्षःपरमेव्योमन्त्सोअङ्गवैद्यदिवुनवेद ॥ ७ ॥

[ ऋग्वेद, मंडल १०, सू. १२९.]

 "तें (नित्य असणारे) त्यावेळी अगदी निष्पंद स्थितींत होते. त्या निष्पंदावस्थेत प्राण आणि आकाश हीही होती. त्यांचे अस्तित्वही मूळच्या निष्पंदरूपांत होते. ही अवस्था अगदीं निष्पंद असल्यामुळे विश्वाला दृश्यरूप नव्हते. याच स्थितीला अव्यक्त असे नांव आहे. अव्यक्त या शब्दाचा अर्थ निष्पंद अथवा हालचाल नसलेली स्थिति असा आहे. नव्या कल्पाला सुरवात होण्याच्या वेळी या अव्यक्तस्थितीच्या साम्यावस्थेत बिघाड होऊन ती स्पंद पावू लागते. त्यावेळी प्राणशक्तीचे धक्के आकाशावर एकामागून एक आदळू लागतात. आकाशाला असे धक्के बसू लागले ह्मणजे त्याच्या विरलावस्थेत फारच फरक होऊं लागून, तेथे घनीभवनाची म्हणजे घट्ट होण्याची क्रिया सुरू होते; आणि आकुंचन व प्रसरण अशा, शक्तीच्या दोन क्रिया सुरू होऊन