पान:विवेकानंद.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
खंड.]
सांख्यदर्शन- प्रकरण १ लें.

९५

गेलें म्हणजे तें नष्ट होते असें मात्र समजूं नये. त्या स्थितीतही त्याचें अस्तित्व शिल्लक असतेंच; पण तें सूक्ष्मरूपाने असतें इतकेच. या सूक्ष्मरूपाला कारणरूप असा संस्कृत पारिभाषिक शब्द आहे. विश्वाच्या कारणरूप अस्ति- त्वाच्या वेळींही निमित्त-काल- देश ही उपाधि शिल्लक असतेच. मात्र तीही अव्यक्तदशेत असते. विश्व दृश्य अथवा व्यक्तस्थितीत येऊं लागले म्हणजे तें ज्या प्रकाराने उत्क्रांत होत जातें, त्याच प्रकारच्या उलट दिशेनें तें अव्यक्त- दशेंत प्रतिक्रांत होतें. अशा रीतीने उत्क्रांतीमागून प्रतिक्रांति ( Involu- tion ) व प्रतिक्रांतीमागून पुन्हा उत्क्रांति अर्से रहाटगाडगें अनंतकाल चालू आहे. यासाठी 'आरंभ' असा शब्द जेथें येईल तेथे फक्त कल्पाचा आरंभ असा अर्थ समजावा.
 विश्वांतील वस्तूंच्या अगद बाह्यभागाला 'जड' (Gross ) अशी संज्ञा सध्याच्या काळी आपण दिली आहे. प्राचीन आर्यतत्त्ववेत्त्यांनी या शब्दा- ऐवजीं 'भूत' या शब्दाची योजना केली आहे. भूतें म्हणजे जडतत्त्वें. या भूतांपैकी एक प्रमुख अथवा मूलरूप असून त्यापासून बाकीचीं सर्व निर्माण झाली आहेत. या प्रमुख भूताला आकाश असें नांव आहे. अर्वाचीन भौतिक शास्त्रज्ञांनी ज्या ईथर ( Ether ) या पदार्थाची कल्पना केली आहे, त्याचें साम्य आकाश या भूताशीं वरेंचसे आहे; तथापि आकाश या शब्दांत अंत र्भूत होणारा सर्व अर्थ 'ईथर' या शब्दानें व्यक्त होत नाहीं. आकाश हैं जड- तत्त्वाचें पहिलें रूपं असून त्यांतून सर्व जडविश्वाची उत्पत्ति झाली आहे. विश्व व्यक्तदशेला येतें त्यावेळी आकाशाला दुसऱ्याही एका तत्त्वाची जोड मिळा- लेली असते. हे दुसरें तत्त्व प्राण होय. प्राण या शब्दाच्या अर्थाचा उलगडा आपणांस पुढे हळूहळू होईल. जोंवर विश्व व्यक्तदशेत असतें तोंवर प्राण आणि आकाश यांचा संयोगही कायम असतो. विश्वांत जी जी म्हणून जड वस्तु अस्तित्वांत आहे, ती आकाश आणि प्राण यांच्या संयोगानेंच उत्पन्न झाली आहे. कल्पांताच्या वेळी या सर्व वस्तूंचें रूपांतर होऊं लागून, त्यांतील तत्त्वें, प्राण आणि आकाश या आपल्या मूलरूपांत प्रविष्ट होतात. ऋग्वेदांत या स्थितीचें वर्णन एका सूक्तांत फारच सुंदर रीतीनें केलें आहे. हें वर्णन अत्यंत काव्यमय आणि हृदयंगम आहे. “ज्यावेळीं अस्तित्व अथवा नास्तित्व यांपैकीं कांहींच नव्हतें, आणि ज्यावेळी केवळ अंधारावर अंधाराची पुढे