पान:विवेकानंद.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९४
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

पुन्हा व्यक्त होतें. ज्याप्रमाणे समुद्राच्या शांततेचा भंग झाला असतां त्यावर लहानमोठ्या लाटा उत्पन्न होऊन, निरनिराळा आकार कांहीं काळ धारण कर तात, त्याचप्रमाणे गुणत्रयसमुद्राच्या शांतीचा भंग झाला म्हणजे, लाटांप्रमाणेंच अनेक आकार त्यावर दिसूं लागतात. ज्याप्रमाणें समुद्रावरील लाट त्याच्या सपाटीपासून वर उठून कांहीं काळ विशिष्ट आकार धारण करते, व पुन्हा थोड्या वेळानें तो आकार टाकून देऊन सपाटीशीं एकरूप होते, त्याचप्रमाणे, गुणत्रयसमुद्रावर अनेक लाटा उत्पन्न होऊन अनेक आकारांनीं कांहीं काळ दृश्यस्वरूपास येतात; व कांहीं वेळाने पुन्हा आपल्या मूळच्या अधिष्ठानाला परत जातात. या रीतीनें या विश्वाची घडामोड क्रमानें सुरू आहे.
 कित्येक प्राचीन तत्त्ववेत्त्यांचें मत असे आहे कीं सारें विश्व एक समयाव- च्छेदेंकरून अव्यक्तांतून व्यक्त होते आणि पुन्हां तें अव्यक्तांतही एकाच वेळीं प्रवेश करतें. दुसऱ्या कित्येकांचें मत याहून वेगळे आहे. त्यांच्यामतें या प्रचंड विश्वांत अनेक मालिका आहेत. आपली ही पृथ्वी जींत आहे ती सूर्याभोवती फिरणारी एक ग्रहमाला आहे. याचप्रमाणे अनेक माला या विश्वांत असून त्यांपैकी एखादी माला अव्यक्तांत गेली असतां, बाकीच्या माला सुरू अस तात. सर्व विश्व एकाच वेळीं अव्यक्त अथवा व्यक्त होत नसून, त्यांतील निर निराळ्या ग्रहमालांमध्ये वेगवेगळी घडामोड निरनिराळ्या वेळी चालू असते. आपली ही सूर्याभोंवतालची ग्रहमाला उद्यां अव्यक्तांत गेली, तरी बाकीच्या माला व्यक्तदशेत राहतील. दुसरे मत पहिल्याहून मला अधिक ग्राह्य वाटतें. निरनिराळ्या मालांच्या व्यक्ताव्यक्ततेचा संबंध एकमेकींशीं नसून, प्रत्येकींतील घडामोड स्वतंत्रपणेंच होत असते; हैं मत मला अधिक तर्कसंमत वाटतें. याप्रमाणे या मतांत भेद दिसत असला तरी, मुख्य गोष्टीबद्दल दोघांचीही आहे; हैं लक्ष्यांत ठेवण्यासारखे आहे. आपण जें जें कांहीं पाहतों तें प्रकृतीच असून तीच व्यक्त आणि अव्यक्त होत असते; या मूलभूत सिद्धां- ताबद्दल मतभेद नाहीं. प्रकृति एक वेळ व्यक्त होऊन पुन्हा अव्यक्तांत परत गेली म्हणजे एक कल्प होतो. आमच्या आर्यतत्त्ववेत्त्यांनी याच स्थितीला परमात्म्याचा उच्छ्वास आणि श्वास अशीं नांवें दिली आहेत. परमेश्वर उच्छ्वास सोडतो त्या वेळीं विश्व व्यक्त होतें, व त्यानें श्वास आंत घेतला म्हणजे त्या- बरोबर जणुंकाय तें त्याच्या हृदयांत परत जातें ! विश्व अव्यक्त स्थितीत परत