पान:विवेकानंद.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
स्वामी विवेकानंद यांचे समग्र ग्रंथ.

[ तृतीय

प्रकरण १ लें.
विश्व - रचना.

 सांख्यदर्शनाच्या आरंभींच आपणांस दोन विशिष्ट शब्दांचा विचार अवश्य केला पाहिजे. ते दोन शब्द पिंड आणि ब्रह्मांड असे आहेत. पिंड म्हणजे अंतःसृष्टि आणि ब्रह्मांड म्हणजे बाह्य विश्व. या दोहोंतून जे कांहीं अनुभव आपणांस प्राप्त होतात त्यांमुळे आपला सत्याचा मार्ग प्रकाशित होतो. पिंडा- च्या अथवा अंतःसृष्टीच्या अनुभवांतून सूक्ष्मेंद्रियशास्त्र (Psychology ), अतींद्रियशास्त्र ( Metaphysics ) आणि धर्मशास्त्र ह्रीं निर्माण झाली आहेत. त्याचप्रमाणे ब्रह्मांडाच्या अनुभवांतून सर्व प्रकारची भौतिक शास्त्रें निर्माण झाली आहेत. सत्य म्हटलें म्हणजे तें या दोन्ही सृष्टीतील अनुभ- वांशी सुसंगत असले पाहिजे. पिंडांत जे कांहीं अनुभव येतील त्याची सत्यता ब्रह्मांडांतील अनुभवांनीं पटली पाहिजे. तसेंच ब्रह्मांडांतील अनुभवांची सत्यता पिंडांतील अनुभवांशी मिळती असली पाहिजे. अशा रीतीनें या दोन्ही सृष्टीं- तील अनुभव परस्परांशी विसंवादी न होतां उलट एकमेकांस पोषक झाले पाहिजेत. जड सृष्टींत जें कांहीं सत्य म्हणून अनुभवास येतें, त्या- चीच हुबेहुव प्रतिमा सूक्ष्म अथवा अंतःसृष्टीत सांपडली पाहिजे; आणि त्याचप्रमाणें अंतःसृष्टींतील सूक्ष्म अनुभवाचें स्थूलरूप, ब्रह्मांडांत सांपडलें पाहिजे. थोडक्यांत सांगावयाचें म्हटले तर जें पिंडीं तेंच ब्रह्मांडी आणि जें ब्रह्मांडीं तेंच पिंडीं असून त्या दोहोंत नेहमीं अभेद असला पाहिजे; पण हा केवळ तात्त्विकदृष्ट्या विचार झाला. प्रत्यक्ष अनुभव याहून उलट येतो. जगाचा इतिहास पाहिला तर या दोन सत्य वस्तूंचा अनेक वेळां तंटा झाला असल्याचे आढळून येतें. जगाच्या इतिहासांत एक काळ असा येऊन गेला की त्यावेळी अंतःसृष्टिशास्त्राचा वरपगडा होऊन बाह्यसृष्टिशास्त्रावर तें वर्चस्व गाजवूं पाहत होतें. दोन दिवस सासूचे आणि दोन सुनेचे या न्यायानें सध्याच्या काळी हें पारडें फिरले असून, भौतिकशास्त्रांचा सर्वत्र जयजयकार होत आहे, आणि धर्मशास्त्र मार्गे पडत आहे. पूर्वी एके वेळीं धर्मशास्त्र सर्व- सत्ताधारी होऊं पाहत होतें. तें म्हणेल तें कारण, आणि बांधील तें तोरण अर्से होण्याचा तो काळ होता; पण पुढे भौतिकशास्त्रांच्या उन्नतीचा काळ आला तेव्हां, त्यांनीं धर्मशास्त्रावर हल्ले करून त्याच्या किल्ल्यांतील मान्याच्या अशा