पान:विधिलिखित - महाराष्ट्रातील सिंचन कायदे.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लेखकाचा संक्षिप्त जीवन वृत्तांत
शैक्षणिक अर्हता : बी.ई. (स्थापत्य) / कर्नाटक रिजनल इंजिनियरिंग कॉलेज, सुरतकल / १९७७; एम.ई. (जल व्यवस्थापन ) / रूडकी विद्यापीठ / डब्ल्यु.आर.डी. टी. सी. / १९८८/सुवर्ण पदक पदनाम: निवृत्त सहयोगी प्राध्यापक (जल व्यवस्थापन), जल व भूमि व्यवस्थापन संस्था (वाल्मी), औरंगाबाद, महाराष्ट्र.
- एकूण अनुभव : ३४ वर्षे (जल संपदा विभाग ६ वर्षे, वाल्मी २८ वर्षे)
प्रशिक्षण: अमेरिका २३ आठवडे (संख्या २), भारत : ६ ३ आठवडे ( संख्या - १६)
अभ्यास व अध्यापनाचे विषय : कालवा परिचालन / देखभाल - दुरुस्ती / व्यवस्थापन / स्वयंचलितीकरण; सिंचन प्रकल्पांचा जल लेखा व बेंचमार्किंग; पाणीपट्टी आकारणी व वसुली, सिंचन कायदे व नियमन निदानात्मक विश्लेषण; स्वतंत्र नियमन प्राधिकरण, सहभागात्मक सिंचन व्यवस्थापन

विशेष योगदानः सदस्य / सदस्य सचिव / समन्वयक म्हणून खालील शासकीय राज्यस्तरीय समित्या व अभ्यास गटात सहभाग

१. महाराष्ट्र सिंचन पध्दतींचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ व नियम २००६
२. महाराष्ट्र पाटबंधारे अधिनियम, १९७६ (सुधारणा)
३. पाणी वापर संस्थांबरोबर शासनाने करावयाचे करारनामे
४. जल लेखा- हस्तपुस्तिका
५. पाणी वापर संस्थांच्या निवडणुक हस्तपुस्तिका
६. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ चे नियम
७. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण अधिनियम, २००५ /
पाणी वापर हक्क विषयक नियम ८. पाणी वापर संस्था (उपसा योजना) - मार्गदर्शक तत्वे
९. सिंचन कायदा ( प्रचलित सर्व कायद्यात सुधारणा व नियम)
१०. सिंचन प्रकल्पांच्या देखभाल-दुरूस्तीचे मापदंड