पान:विधवा दुःख निवेदन.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मोठ्याची असो अथवा भट भिकाऱ्याची असो; तिने सर्वदां काबाड कष्ट करीत असावें, पती मरून सर्व सुखाला मुकलेली असल्यामुळे तिने सुख का ध्यावें? पण मी ह्मणतें तुह्मीं आपले धर्माच्या आड आमाला जावू देऊ नका. आमचा उत्तम वेळ फुकट कां दवडितां ? लिहिणे वाचणे शिकविणे, कशिदा काढणे, यापासून कोणाच्या धर्माला धक्का बसत नाही ना? पण त्यालासुद्धा दोन अडचणी आहेत एकतर पैसा नाही, दुसरे तिनं चांगले कांहीं करितां कामा नये. आणि इतकेंही असून एखादी जर त्या उद्योगाला लागली, तर लगेच मणण्याला झाली सुरवात, की हे हो आतां तुझी कशाला नी कोणाला करणार; पहा, बिचारा गेला मरून आणि तुह्मांला आतां आली आहे उमेद. झालं! अशा रीतीने बिब्बा घातला ह्मणजे उमेद असली तरी एकीकडे ठेवून गप्प बसणे भाग पडते. हीच आमच्या ममतेच्या मंडळींची मदत आणि केलेल्याला बक्षीस. अशा रीतिने आमचेवर घरांतील सर्व लोकांचे प्रेम असल्यावर आमचे दिवस किती सुखाने जातील. व उजाडल्या पासून संध्या-. काळपर्यंत करमणूक कशी करावी. अशा स्थितीत दिवसाचा तास होईल की, तासाचा दिवस होईल, हा विचार करणे वांचकांवरच सोपविते. माझ्या सारख्या दुर्दैवी भगिनी बहुतेक कुटुंबांत आहेत. मात्र विचारकरून पाहिले पाहिजे. आपले घरांत तीची योग्यता कशी ठेविली आहे; मान देतात