पान:विधवा दुःख निवेदन.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

किंवा यकःश्चित समजतात; पण या गोष्टी कोणाचे लक्षांत येणार ? बरोबरच आहे. जलाविण मासा । तळमळे तो कैसा ॥ जावें त्याच्या वंशा । तेव्हां कळे ।। (तुकाराम) याप्रमाणे माझी स्थिती आहे. आतां आपल्या मनावर ठसण्यासाठी थोडीशी माझी हकिगत देऊन माझा हेतु काय आहे, तो वाचकांपुढे ठेवितें. माझें मूळवर एका खेड्यांत आहे. तेथे मी जन्मतांच माझी आई वारली व माझें पाळण पोषण माझ्या प्रियकर चुलतीने केले. माझे वडिल भाऊ तिघे. व मी ही मिळून चौधे परदेशी झालो. त्या चौघांत माझा बाळंदा माझ्या चुलतीवर पडला. माझ्या चुलतीने आपले लहान मुल एकीकडे ठेऊन मला अंगावर घेऊन लहानाची मोठी केली. व तिची मुलगीही माझ्या बरोबरीची असल्यामुळे मी ही माझ्या चुलत बहिणी बरोबर घुलतीला आई या नावाने हांका मारीत होते. त्यामुळे बहुतेक लोकांनां मी तिचीच असे वाटे. व मलाही आई ह्मणजे काय हे माहित नसल्यामुळे मला तीच आपली आई असून सर्वात अधीक वाटे. माझ्या मेलेल्या आईच्या पश्चात् जरी आमचे वडील होते तरी ते आमची विसपूससुद्धां घेत नसत. कारण आई होऊन अधिक प्रेम करणारी सुशील चुलती व बापाहून अधिक प्रेम करणारे सद्गुणी चुलते असतां वासपूस घेण्याची जरूरच राहिली