पान:विधवा दुःख निवेदन.pdf/8

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चमकते; पण पुन्हा अंधकार आहे तो आहेच. असो; आमच्या विद्वान भगिनी जर मनांवर घेतील तर सर्व काही होईल. परंतु अशी कामें पैशाशिवाय होत नाहीत व पैसा असुनही पुरुषाची मदत पाहिजे. पण आपले लोकांत एखादा गृहस्थ आपल्या विद्वत्तेमुळे जर धनसंपन्न झाला तर त्याची स्त्री ऐश्वर्याचे योगानें जीर्ण व अशक्त होते. ह्मणून तिचेसाठी एखाद्या डाक्टरची नेमणूक करण्याची वेळ येते. मग निराश्रित झालेल्या बाल-विधवांस शिक्षण देण्याचे व देश सुधारण्याचे लांबच राहिले. आतां एखाद्या स्त्रियेला घरांतील लोकांनी मदत करावी; पण मदत तर होतच नाही. मात्र जनाच्या निंदेस मदत करितात आणि आपली चार अक्षरेही घालितात. आमचे हिने नांव बुडविलें; हा धंदा चालवून आह्मांला मान खाली घालावी लागली; आह्मीं अन्न कां घालीत नव्हतो ? आतां ह्या स्त्रियांना हे चाळे हवेत कशाला ? स्वस्थ जेवून राम राम ह्मणत बसूनये? बघा! नवरा नसला ह्मणजे स्त्रिया धीट व हुशार होतात. कोणालाही जुमानित नाहीत. अशा नाना त-हेचे वाग्बाणांनी विनाकारण घायाळ करितात; बरें सर्वांचे निंदेकडे जर अलक्ष करावें तर जवळ पैसा नाही. सर्व जिणे त्यांच्यावर अवलंबून असते. तिने काही करूं नये; उजेडल्या पासून संध्याकाळपर्यंत काबाडकष्ट करावेत; आणि तोंडांत मिठाची गुळणी घालून गप रहावे; तरच तिचा निभाव लागेल. ती थोरा