पान:विधवा दुःख निवेदन.pdf/7

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

धैर्य येणार कोठून ? आपल्या लोकांत एक ह्मण आहे की, " आई जेऊं घालीना आणि बाप भीक मागू देईना. " या ह्मणीप्रमाणे ते स्वतः आमची व्यवस्था करित नाहीत! व आमी केली तर अब्रू जाते. मिळून हाल कोणाचे ? आमचे, आपल्या ब्राह्मण लोकांत स्त्रियांना किती प्रतिबंध आहेत हे वाचकांना माहितच आहे. एखादी मुलगी १२ वर्षांपुढे जर शाळेला गेली, तर लोक तिच्या आईबापांची निंदा करितात; व आपल्या लोकांत निंदेचे किती प्राबल्य आहे हे ही वाचकांना माहीत आहे. एखादी बायको आपले प्रिय पतीचे मदतीने पुढे गेली, तर तिचीसुद्धां लोक निंदा करितात की, आतां आमच्या सगुणाबाई एम्. डी. डॉक्टर होणार; मग तिचे पती कंपाउन्डर होऊन बाटल्या आणून पुढे ठेवणार; मग आमच्या विद्वान बाई त्यांना हुकूम करणार. असी एकच काय, हजार! पण ती आपल्या पतीचे मदतीमुळे कोणाला जुमानीत नाही. साहजीकच आहे. आपल्या जन्माचे रक्षण करणारा आपला प्रिय पती सहाय असल्यावर कोणाचीही भिती नाही. पण अशा स्त्रिया आपल्या लोकांत कोठे फार झाल्या आहेत. एकट्याच काय त्या कै० सौ० आनंदीबाई जोशी त्या तरी कोठे उदयाला आल्या ? आमचे दुर्दैवामुळे त्याना या भूमीवर सहा महिने सुद्धां राहू दिले नाही. त्या जर वांचल्या असत्या, तर आमच दुर्दैवाला कदाचित धक्का बसला असता व त्याला कोठे स्थल मिळाले नसते. जशी आकाशांत बांध