पान:विधवा दुःख निवेदन.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वाचे ध्यानात येत नाही. ते ह्मणतात की, आपण फार सुधारणा केली; विद्यालये घालून स्त्रियांना सुशिक्षित केले हे खरे. व त्याविषयी त्यांचे आभार मानावेत; त्याच शिक्षणामुळे जगांत अविचाराने घातलेले नियम व कुटुंबांतील मंडळीविषयीं जनाचे अपूज्य वर्तन आमांस स्पष्टपणे दिसू लागलें. आमचें जिणे ह्मणजे पुरुषांवर अवलंबून आहे. ह्मणून सर्वांनी आपल्या कुटुंबाविषयी काळजी घेतली पाहिजे. व हे जे त्यांचे कर्तव्य मी सांगते ते त्यांचे हातून होण्यासारखे आहे. कारण, ते अवघड नाही; मात्र सर्वांनी विचार केला पाहिजे. कारण, स्त्रिया ह्मणजे पतीच्या मरणानंतर पक्या पराधीन बनतात; ह्मणून त्यांचे जवळ थोडा पैसा असणे अवश्य आहे. जिच्या नवऱ्याने थोडा पैसा मिळविला असेल तिचे ठिकच; परंतु जिच्या नवयाचा पैसा नाही, तिचे हाल कांहीं पुसू नये. तिनं एका पैशासाठी कोणाकडे पहावे व कोठं मागावे हा विचार कोणाच्याच मनांत येत नाही, याबद्दल मोठे आश्चर्य वाटते. कारण ही गोष्ट बहुतेकांच्या घरीं अनुभवास येते हे एक. आतां दुसरा प्रश्न असा की, तुह्मी दिलेल्या शिक्षणाच्या मदतीने एखादा पाय पुढे घालू मटले, तर जुनी वहिवाटरुपी जी एक मध्ये आड नदी आहे, ती ओलांडून जावे कसे ? बरें; कदाचित् इतकेंही मागे टाकून एखादी स्त्री पुढे गेली, तर तिचेवर निंदेचे वादळ व अपवादाची ढगावर ढगे येऊन आदळू लागली ह्मणने निराश्रीत झालेल्या अवलांना सबल