पान:विधवा दुःख निवेदन.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

[६४] आपल्या घरच्या बायकांना तो समान वागवितो काय ? असें जोपर्यंत आमच्या बंधूंच्या हातून होत नाही तोपर्यंत ही पुराणांतली वांगी पुराणांतच राहणार ! बोलणे सोपें पण करणी फार अवघड. आपण त्यांच्यावरच अवलंबून उपयोग नाही. दुर्दैवाने जरी आमची सर्वस्वी पाठ धरिली आहे तरी आपण धैर्य सोडता कामा नये. आपण संकटांत पडलों तर खऱ्याच, पण आमच्यासारख्या ज्या गरीब गाईवर असा प्रसंग कोसळेल त्यांच्यासाठी आपण श्रम केले पाहिजेत. आमची दीन दशा, आमचे हाल बंधूंपुढे वरचेवर मांडून त्यांच्या हृदयास द्रव आणला पाहिजे. आमची हृदयद्रावक कहाणी ऐकिली तर दगडास सुद्धा पाझर फुटेल; मग हे तर पाठीला पाठ लावून आलेले आमचे बंधु; ह्यांना आमची कीव नाही का येणार ? मी ह्मणतें खातरीने येईल. शिवाय, भगिनींनो, तुह्मांला आणखी एक गोष्ट सांगते. तमचे आचरण निर्मळ व निष्कलंक असूदे. परमेश्वराची भक्ति नेहेमी अंतःकरणांत असूदे. धर्म व नीति ह्यांचा आश्रय करून लोकांकडून भलेपणा मिळवून घ्या. तुमचा देह सांदीकोंपन्यांत पडला हे तर खरेच; पण त्याचा सदुपयोग करण्याचे तुमच्याच हाती आहे. आजपर्यंत झालेल्या मोठमोठ्या स्त्री पुरुषांची चरित्रं लक्षात आणा. त्यांनी आपला देह परोपकारासाठी कसा शिजविला हे ध्यानी आणून त्यांचा कित्ता गिरवा. हा देह मटला ह्मणजे